या वेळी मालेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या अन्याय्य प्रकरणांचा आढावा घेऊन दिशा निश्चित करण्यात आली. मालेगाव शहरासाठी स्वतंत्र कामगार न्यायालय होणे गरजेचे असून बहुसंख्य कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात कामगार न्यायालय तत्काळ मंजूर करण्यात यावे, या मागणीचा ठराव संमत करण्यात आला. प्राचार्य रमेश पवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. मालेगाव मनपा आरोग्य सेविकांच्या वेतनाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मेळाव्यास विभागीय उपाध्यक्ष रमेश पवार, भास्कर शिंदे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे, मोहन यशवंते, केदाभाऊ महिरे, संगीता सोनवणे, राजेंद्र मोहिते आदींनी सहविचार सभेत मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन घनश्याम अहिरे यांनी तर आभार अंकुश वाल्ल्हे यांनी मानले.
मालेगावी कास्ट्राईब महासंघाची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:41 AM