सिन्नर : सिन्नर स्थित येवला येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कातील आठ जणांसह दोन दिवसात अन्य २२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सिन्नरकरांना दिलासा मिळाला. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत २२ अहवाल निगेटिव्ह आले.शहराच्या मध्यवर्ती भागातील रहिवासी असलेल्या या रुग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.सिन्नर शहरातील तानाजी चौकातील रहिवासी असलेल्या येवला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाºयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील घरातील ८ जणांना सिन्नरच्या आरोग्य विभागाने क्वॉरण्टाइन केले होते. त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या आडगाव येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याशिवाय ग्रामीण भागातूनही दोन जणांना सर्दी, खोकला आणि कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्याही घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. होते. शुक्रवारी (दि. ८) सकाळी या १० संशयित रुग्णांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले. या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.
सिन्नरकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:05 PM