नाशिक : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नाशिक शहर परिसरात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियान मोहिमेत शहरातील विविध प्रभागातून तब्बल ३०.४८ टन कचरा संकलित करण्यात आला.डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरातील ८५ पेक्षा जास्त शहरात सदर मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नाशिक शहराचाही समावेश होता. शहरातील या स्वच्छता मोहिमेसाठी शहरामध्ये सुमारे २७४९ स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रभागांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २०६.३३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. या व्यापक मोहिमेत ३०.४८ टन कचरा संकलित करण्यात येऊन तो कचरा डेपो येथे नेण्यात आला. स्वच्छता मोहिमेंतर्गत नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स, आयटीआय पूल ते एमआयडीसी आॅफिस, नाशिकरोड स्टेशन परिसर, शिवाजी पुतळा ते शालिमार, सैलानी बाबा बसथांबा ते विहितगाव जेलरोड परिसर, उत्तमनगर-पवननगर ते दिव्या अॅडलॅब थिएटर, शालिमार ते म्हसरूळगाव, सिडको पंडितनगर बसथांबा ते पाटीलनगर पेठे विद्यालय, वडाळा नाका ते गुरू गोविंदसिंग महाविद्यालय, पाथर्डी फाटा परिसर, आरटीओ कॉर्नर ते अशोकस्तंभ मखमलाबादरोड, अमृतधाम औरंगाबादरोड ते जुना आडगाव नाका हिरावाडी, गणेशवाडी ते नाग चौक, काळाराम मंदिर परिसर ते गोदाघाट, शुभम पार्क ते अंबड पोलीस स्टेशन-मुंबई महामार्ग, शुभम पार्क ते दिव्या अॅडलॅब थिएटर- अंबड लिंकरोड, अशोकस्तंभ ते आनंदवली.
शहरातून 30.48 टन कचरा संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2015 11:59 PM