येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्य समाजवाद, त्यांचे आर्थिक, सामाजिक, राष्ट्रवादी विचार हे एकूणच संपूर्ण मानवजातीसाठी नेहमीच दिशादर्शक ठरणारे आहेत. त्यांनी केवळ दलितांनाच आरक्षण दिले असे नाही तर विकासाच्या प्रवाहात मागे राहिलेल्या प्रत्येक समाजघटकाला आरक्षण दिले. त्यांनी लिहिलेली राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. हाच खरा देशाचा धर्मग्रंथ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक विचारप्रणाली’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कोकाटे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य शासनप्रणाली ही जगातील सर्वात श्रेष्ठ शासनप्रणाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली. त्यांचे कार्य हे कोणत्या जातीपुरते मर्यादित नव्हते तर ते सर्व समाजासाठी, संपूर्ण मानव समूहासाठी होते. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलात सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांचे हित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिराकुड धरण बांधण्यासाठी केलेला खटाटोप, शेतकर्यांचे काढलेले मोर्चे त्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयीच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय देणारे असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. गमे यांनीही मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिवाजीराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शरद चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर डॉ. मनीषा गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक सहाय्य मिळाले. दरम्यान, महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.
फाेटो - १४ येवला कॉलेज
येवला महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य भाऊसाहेब गमे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
140421\14nsk_57_14042021_13.jpg
===Caption===
फाेटो - १४ येवला कॉलेज येवला महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य भाऊसाहेब गमे यांचेसह प्राध्यापक, कर्मचारीवर्ग.