नाशिक : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्यातच घरांच्याबांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दरही गगनाला भिडल्याने आता घराचे बांधकाम करणेही महाग झाले आहे. वाळू,गट्टू, वीट, स्टील व सिमेंट यांच्या दरांमध्ये लॉकडाउनच्या नंतर जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे नव्याने घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे.
नाशकात काही ठिकाणी बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात लॉकडाउनच्या काळात वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे इतर राज्यातून येणारे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. तर वाळू उपसा करणारी मशीन व क्रशर मशीन तसेच त्यासाठी लागणारे केमिकल्स व कच्चा माल यांचेसुद्धा दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना हव्या तेवढया प्रमाणात साहित्य उपलब्ध नाही. यामुळे बांधकाम करणाऱ्यांची चारही बाजूंनी कोंडी झाल्याचे चित्र सध्या नाशिक शहरासह जिल्हारात दिसून येत आहे.
इन्फो-
बांधकाम साहित्याचे दर का वाढले
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प होते.त्यामुळे बांधकाम साहित्य बनवण्याचे कारखाने व मशीन यादेखील बंद होत्या. तसेच बहूतांश मजुरांनी घरची वाट धरल्याने काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासत होता. आजही या क्षेत्रात पन्नास टक्के मजुरांचा तुटवटा भासत आहे. लॉकडाउन मुळे वाहतूक ठप्प असल्याने बरेच साहित्य इतर राज्यात अडकून पडले होते. शहरासह जिल्हाभरात बांछधकाम साहित्याची मागणी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत बांधकाम साहित्याचा पुरवठा कमी होत आहे
कोट-
बांधकाम क्षेत्रात महत्वाचे घटक असलेल्या स्टील आणि सिमेंटसह वाळू, विटांचा उत्पादन आणि वाहतूक खर्च वाढाला असून त्याचा थेट परिमाम बांधकाम साहित्याच्या भावावर झाला आहे. वाळूला पर्याय म्हणून वॉशसॅण्डचा वापर होतो. मात्र वीटेला पर्याय असलेल्या ठोकळ्याचेही भाव वाढले आहे. सुनील महाजन , बांधकाम साहित्य विक्रेता
इन्फो-
बांधकाम साहित्य - लॉकडाऊन आधीचे दर - नंतरचे दर
वाळू - ६००० - ७०००
गट्टू- ९५०० - १०,०००-
विटा- ५६०० - ६०००
स्टील- ४६७०० - ४८.०५०
सिमेंट- ३३५ - ३५०