कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त कैलास जाधव उपस्थित होते. कोविड सेंटर उभारण्यासाठी एमआयडीसीने आयटी बिल्डिंग दिली आहे, महानगर पालिका मूलभूत सोयी सुविधा देणार आहे. आयमा ऑक्सिजन प्लांटसाठी मदत करणार असून, यासाठी ज्या उद्योगांनी सीएसआरमधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी मदत केली आहे, अशा उद्योजकांचा महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्तांनी उद्योजकांना जम्बो कोविड सेंटरबाबत माहिती दिली. ५०० बेड्चे अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम चालू आहे. त्यासाठी आयमाने भरघोस मदत केली आहे. तसेच छोट्या व मध्यम लघु उद्योजकांनी हॉस्पिटल बेड, साईड टेबल, सलाईन स्टँड, जेवण व इतर स्वरूपातील मदतीसाठी त्यांनी आवाहन केले. तिसरी लाट येऊ नये, पण आलीच तर त्यासाठी ५०० बेडचे हॉस्पिटल उभे करत असल्याचे सांगितले, तिसरी लाट आलीच तर आपण पूर्ण तयारीसह सज्ज असायला हवे, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, सरचिटणीस ललित बुब, आयमा विश्वस्त समिती चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, आयपीपी राजेंद्र अहिरे, मनपाचे संजय घुगे, उदय धर्माधिकारी, वनमाळी, विवेक पाटील, राजेंद्र पानसरे, योगिता आहेर, प्रमोद वाघ, अनिल डिंगरे, अविनाश मराठे, अविनाश बोडके, अमेय पिंपळखरे, दीपक ठाकरे, प्रवीण शेख, सतीश कोठारी, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे आदी उपस्थित होते. आयमाचे सरचिटणीस ललित बुब यांनी सूत्रसंचालन केले. आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आभार मानले.