लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या दीड तासाच्या कालावधीत शहर जलमय करण्याच्या प्रकारानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली असून, नालेसफाईसह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत त्या पार्श्वभूमीवर आता नदी नाले संकुचित करणाऱ्या किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आयुक्त अभिषेक कृष्णा वक्रदृष्टी करणार असून, लवकरच अशी पक्की बांधकामे हटविण्यात येणार आहे.बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर शहराची झालेली अवस्था बघता महापालिकेला नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. तथापि, त्या दिवशी दीड तासात सरासरी ९२ मिमी म्हणजे तासाला ८५ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. एका तासात पन्नास मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला की आपत्ती मानली जाते असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. बुधवारच्या या पावसामुळे अशाप्रकारे पाणी साचले गेले हे खरे असले तरी नागरिकांनी कॅरीबॅगसारख्या घातक वस्तू वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले.सातपूर-अंबड लिंकरोडवर असलेली भंगार दुकाने शांततेत हटविल्याने आयुक्तांनी आता अशाप्रकारची हटविणे कठीण नसल्याचे सांगितले.
नाल्यांवरचे बांधकाम आता रडारवर !
By admin | Published: June 17, 2017 12:45 AM