पाटणे : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावापासून स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी तसेच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पाटणे येथे पूर्ण बॉडी सॅनिटायझर प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे.मुंगसेतील स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्थ सुजित सूर्यवंशी यांच्याकडून पाटणे ग्रामपंचायतीला पूर्ण बॉडी सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आले. त्याचे उद्घाटन सरपंच राहुलाबाई अहिरे, सुजित सूर्यवंशी, माजी सरपंच नथू खैरनार, तुकाराम बागुल, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, कमलाकर खैरनार, संदेश खैरनार, कल्पेश खैरनार, नाना निकम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पाटणे गावाच्या वतीने सूर्यवंशी यांचा सत्कार माजी सरपंच तुकाराम बागुल यांनी केला. सूर्यवंशी यांनी कोरोना विषाणूजन्य पार्श्वभूमीमुळे विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कमलाकर खैरनार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पाटणे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, विविध ग्रुपच्या वतीने विविध उपाययोजना करून कोरोना विषाणूचा गावात शिरकाव होणार नाही याची काळजी घेतली जात आहे असे सांगितले. नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे असे आवाहन करण्यात आले.
पाटणे येथे सॅनिटायझर प्रवेशद्वाराची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 8:44 PM