नाशिक : महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने १८ ते ६० वयोगटातील बांधकाम मजुरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या १ मार्चपासून महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांत त्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात येणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. २३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापौरांसह पदाधिकाºयांशी संवाद साधला आणि बांधकाम मजुरांचे विशेष नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार, महापौर रंजना भानसी यांनी तातडीने के्रडाईच्या पदाधिकाºयांसमवेत बैठक घेत नोंदणीसाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दि. ४ मार्च रोजी क्रेडाईच्या कार्यालयात नोंदणीसाठी विशेष कक्ष कार्यान्वित केला जाणार असून, सदस्यांकडून होणाºया कामगारांच्या नोंदणीचे शुल्क स्वत: के्रडाईने भरण्याची तयारी दर्शविली आहे. दि. १ मार्चपासून महापालिकेच्या सहाही विभागांत विशेष नोंदणी कक्ष उभारण्याच्या सूचना महापौरांनी विभागीय अधिकाºयांना दिल्या. महापालिकेच्या कोणत्याही प्रकारच्या कंत्राटदारांकडे ९० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करणाºया मजुरांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार १८ ते ६० वयोगटातील मजुरांना नोंदणी करता येणार असून, त्याने ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित कंत्राटदारांकडून प्राप्त करून ते सादर करणे आवश्यक आहे. कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम मजुरांसाठी २८ प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रसूतीसाठी आर्थिक लाभ, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अपघाती विमा यांसारखे लाभ आहेत. नोंदणी करणाºया बांधकाम मजुरांनाच सदर लाभ मिळू शकतात, असे कामगार उपआयुक्त गुलाब दाभाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, कामगार कल्याण अधिकारी हरिभाऊ फडोळ यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल व पदाधिकारी उपस्थित होते.विभागात ७३ हजार ५२८ कामगारकामगार कल्याणकारी महामंडळाकडे नाशिक विभागात ७३ हजार ५२८ बांधकाम मजुरांची नोंदणी आहे. त्यात सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यांतील ५६९२, तर उर्वरित नाशिक जिल्ह्यात १० हजार २७७ बांधकाम मजुरांचा समावेश आहे. शासनाकडून एक टक्का कामगार कल्याण सेस म्हणून कापला जातो. महामंडळाकडे सध्या सहा हजार कोटी रुपये असल्याची माहिती कामगार उपआयुक्त दाभाडे यांनी दिली.
बांधकाम मजुरांची नोंदणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:22 AM