शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

येवल्यातील बांधकाम उपअभियंता लाच घेताना जाळ्यात

By admin | Published: June 19, 2014 12:28 AM

आंबेगाव : ठेकेदाराकडून २५ हजारांची लाच घेताना जिप बांधकाम विभागाचे येवला उपअभियंता वसंत बबन वाईकर यांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

आंबेगाव (ता. येवला) : येथील स्मशानभूमी व गाव रस्त्यांचे बारा लाखांचे देयक मंजुरीसाठी ठेकेदाराकडून २५ हजारांची लाच घेताना जिल्हा परिषद (इवद) बांधकाम विभागाचे येवला उपअभियंता वसंत बबन वाईकर यांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वाईकर यांना अटक करण्यात येणार असल्याचे लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक नजीर शेख यांनी सांगितले. वसंत वाईकर हे १७ जून २०१३ रोजी येवला येथे उपअभियंता म्हणून रुजू झाले. आज बरोबर एक वर्षानंतर ते लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले. मनोज शांताराम गिते (रा. आंबेगाव) या बांधकाम ठेकेदाराने आंबेगाव (ता. येवला) येथे स्मशानभूमीच्या काँक्रीटीकरणाचे पाच लाखाचे व गावातील प्रभाग क्र. ३, ४ व ५ मधील रस्ता काँक्रीटीकरणाचे सात लाखांचे असे एकूण बारा लाखांचे देयक मंजुरीसाठी उपअभियंता वाईकर यांच्याकडे पडून होते. सदर देयकांच्या मंजुरीसाठी २५ हजारांची लाच, तक्रारकर्ते मनोज गिते यांच्याकडे मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत खात्याकडे गिते यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली होती. बुधवारी (दि. १८) खात्याचे पोलीस उपअधीक्षक नजीर शेख, हवालदार एस.जी. नाठे, एन.डी. गांगुर्डे, व्ही. बी. कंदीलकर यांनी पोलीस अधीक्षक शशीकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेश बदलून येवला पंचायत समिती परिसरातील बांधकाम विभागाच्या (इवद) उपअभियंता कार्यालयातील कॅबीनमध्ये प्रत्यक्ष लाच स्वीकारतांना वाईकर यांना ताब्यात घेतले. यापूर्वी ७ मार्च २०१४ रोजी तत्कालीन येवला प्रांतधिकाऱ्यांवर ही अशा प्रकारची कारवाई झाली होती. (वार्ताहर)