शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

महावितरणकडून वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहक जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 11:25 PM

कळवण : तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून, तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही, त्यामुळे आंदोलन करून लक्ष वेधले जात असताना दुसरीकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा रॅली काढून वीजबिल भरणा करण्याचे आवाहन वीज ग्राहकांना करीत आहे.

ठळक मुद्देकळवण : ४१९३ ग्राहकांनी थकबाकी ; १४ कोटी ५३ लाख रुपयांचा केला भरणा

कळवण : तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून, तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही, त्यामुळे आंदोलन करून लक्ष वेधले जात असताना दुसरीकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा रॅली काढून वीजबिल भरणा करण्याचे आवाहन वीज ग्राहकांना करीत आहे.महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, मालेगावचे अधीक्षक अभियंता रमेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कळवणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, उपकार्यकारी अभियंता नितीन अंबडकर यांनी महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यासाठी कळवण उपविभागीय कार्यालयापासून रॅलीचे आयोजन केले होते.यावेळी रॅलीमध्ये वीजबिल भरणा करा, महावितरणला सहकार्य करा, वीज चोरी टाळा, नवीन कोटेशन घेऊन वीज पुरवठा सुरळीत करा, अशा विविध घोषणा दिल्या जात होत्या.रॅलीत कृषिपंप, व्यावसायिक, घरगुती ग्राहक आदी ग्राहकांना महावितरणच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासन ऊर्जा विभाग व महावितरणद्वारे कृषी धोरण २०२० योजनेमध्ये कळवण तालुक्यातील कृषी ग्राहक १४६५३ पैकी ४६९३ ग्राहकांनी चालू व थकीत देयक भरणा करून सहकार्य केले आहे.संबंधित योजनेंतर्गत योजना सुरू झाल्यापासून चालू देयक ३९० कोटी रुपये थकबाकी पोटी भरलेल्या रकमेमुळे मिळवलेली अतिरिक्त सूट रुपये १०.६२ कोटी रुपये आहे. ४१९३ ग्राहकांनी थकबाकी २१.२४ कोटी पैकी योजनेत चालू बिलात १४ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. महाराष्ट्र शासन व ऊर्जा विभागाकडून १० कोटी ६२ लाख रुपये देण्यात आले आहेत. एकूण थकबाकी ही ११२.२७ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात येऊन शेतकरी बांधवांनी कृषिपंपावर कॅपेसिटर बसविण्याचे आवाहन अंबाडकर यांनी यावेळी केले.या रॅलीत कनिष्ठ अभियंता जयेश मोरे, मेघराज बागुल, प्रवीण उगलमुगले, एस. एस. खुरकुटे, गजानन पगार, जयराम साबळे, हेमंत आहेर, पी. टी. गायकवाड, राजेश चौरे, किरण जाधव, युवराज निकम, मोहन पवार आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज