नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने हवामान आधारित फळ पीकविमा काढूनही विमा कंपनीच्या हवामान केंद्रात अवकाळी पाऊस व घसरलेल्या तापमानाची नोंद न झाल्याचे कारण दाखवून द्राक्ष उत्पादक शेतकºयाला पीकविमा नाकारणाºया अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दणका दिला आहे. कंपनीची सेवा विश्वासार्ह नसल्याचे ताशेरे ओढून मंचाने विमा कंपनीच्या विविध प्रकारच्या नियमांवर आक्षेप घेतला आहे. विमा काढलेल्या शेतक-याला हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत.दरम्यान, विमा कंपनीला ग्राहक मंचामार्फत कारवाईला सामोरे जाण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. न्यायमंचाच्या या निकालाच्या आधार घेऊन शेतकऱ्यांना यापुढे ग्राहक मंचाचे दरवाजे यानिमित्ताने खुले झाल्याचे मानले जात आहे. न्यायमंचाने काय म्हटले...योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कंपनीवर असली तरी, ती कशाही प्रकारे पार पाडणे असा होत नाही. त्यात निष्पक्षता आवश्यक आहे. अन्यथा तिचा लाभ शेतकरी व कंपनीला होणार नाही. पुराव्यावरून वेदर स्टेशन निश्चित उरत नसल्याचे दिसून येते.
पीकविमा कंपनीला ग्राहक न्यायमंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:55 AM