शून्यातून विश्व उभे करणारे एक यशस्वी उद्योजक म्हणून नंदकुमार जंगम व त्यांचे पुत्र चेतन जंगम हे उद्योगजगतात परिचित आहेत. परंतु, ही सारी वाटचाल अशी सहजासहजी झालेली नाही. नंदकुमार जंगम हे मूळचे वडनेर भैरव या छोट्याशा खेडेगावातले. त्याच ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. सोन्याचे मनी ओवणे व गाठणे हा जंगम समाजाचा पारंपरिक व्यवसाय, मात्र कामाची चिकाटी, जिद्द असल्यामुळे अथक परिश्रम घेऊन ते पिंपळगाव येथे स्थायिक होऊन गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, उद्योग भवन, बांधकाम व्यवसायासोबत पिंपळगावात जंगम ज्वेलर्स नावाने सोन्याच्या दागिन्यांचे शोरूम सुरू केले. आणि ७ ऑक्टोबर २०१९ रोजी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नंदकुमार जंगम यांचे चिरंजीव चेतन जंगम यांनी अल्पावधीतच शोरूमचा संपूर्ण कारभार अगदी उत्तमरीत्या सांभाळला. मागील पंधरा महिन्यांचा कालावधीचा अनुभव पाहता ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी चेतन यांनी जवळपास बरेच यशस्वी प्रयत्न केले.
जंगम ज्वेलर्स या शोरूमची त्यांनी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्येदेखील तयार केली आहेत. जे ग्राहकांना चांगली सेवा देतात. त्यामुळे पिंपळगावच्या जंगम ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे ग्राहक सोने खरेदीसाठी पहिली पसंती जंगम ज्वेलर्सलाच देतात. सर्वात कमी भाव व मजुरी, संपूर्ण दागिने बी.आय.एस. हॉलमार्क, बदली दागिन्यांचा योग्य परतावा, कॅरेटमीटरची सुविधा, संपूर्ण दागिने बिना घटीचे, दरमहा गुंतवणूक ऐश्वर्य लक्ष्मी योजना यामुळे जंगम ज्वेलर्सने पिंपळगाव पंचक्रोशीतील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
===Photopath===
140121\14nsk_15_14012021_13.jpg
===Caption===
जंगम ज्वेलर्स