शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:08 AM

आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.  ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडल्याने स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न कायम सतावत आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगरसह नाशिकरोड परिसरातही भाज्यांचे दर कडाडले आहेत.शहरातील बाजारपेठेत सगळ्याच भाज्या उपलब्ध असल्या तरीही बाजारात नव्याने दाखल झालेल्या कांद्यांची ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे. नवा कांदा हा ओलसर असल्याने या कांद्याची साठवणूकदेखील करता येत नाही त्यामुळे या कांद्याला तुलनेने उठाव कमी आहे. परतीच्या पावसापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल २७०० ते ३००० असताना कांद्याची विक्री किरकोळ बाजारात २० रुपये ते ३० रुपये किलोने होत होती, परंतु आज कांद्याचा भाव प्रति क्विंटल २३०० ते २६०० रुपये असून, हाच भाव किरकोळ बाजारपेठेत ४० रुपये किलो असा आहे.  दिवाळीच्या सुटीत मेसचालकांचा व्यवसायान ेदेखील अपेक्षित गती घेतलेली नसल्याने बाजारपेठेतील भाज्यांना उठाव कमी आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने ग्राहकांना किलो, सव्वा किलो भाज्या खरेदीसाठी किमान शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. भाजीबाजार तसेच छोट्या गाड्यांवर टमाटा, भोपळा, फ्लॉवर, दोडके, वांगी, भेंडी, ढोबळी मिरची, वाल, कारली, गिलके आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, मात्र या भाज्या ४० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांचे दैनंदिन स्वयंपाकाचे सूत्र कोलमडले आहे.  पुढील आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर तसेच नागरिक बाहेरगावाहून शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील बाजार पेठेतील चित्र बदलेल, अशी अपेक्षा भाजी व्यावसायिकांनी केली आहे.समाधानकारक बाजारभावपरतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतमालाला बसला आहे. पावसामुळे आवक कमी झाली असली तरी शेतमालाला हमीभाव मिळतो आहे. चांगल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च तर निघतो शिवाय बळीराजाला आर्थिक फायदा होत आहे.  - युवराज पगारे, शेतकरीखिशाला आर्थिक फटकागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांद्यासाठी ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांच्या खरेदीसाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना मोठी कसरत करावी लागते.  - गणेश परदेशी, ग्राहकदिवाळी सुटीचा परिणामआताच्या तुलनेत दिवाळीपूर्वी भाज्या स्वस्त होत्या. ऐन दिवाळीमध्ये भाज्यांचे दर वाढले असताना ग्राहक बाजारात खरेदीसाठी बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुटीनंतर बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा  आहे.  - राजा अर्धापुरे, भाजीविक्रेताएरवी पर्याय उपलब्धदिवाळीच्या सुटीसाठी पाहुणे आलेले असताना भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी घरातील सदस्य असताना भाज्यांसाठी डाळ, वरण, खिचडी असे पर्याय उपलब्ध असतात, परंतु पाहुणे असताना दरवाढ असली तरीही भाज्या खरेदी कराव्याच लागतात.  - कल्पना माळवे, ग्राहक