नाशिक : पारंपरिक सणांमध्ये प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्थान महत्त्वाचे असल्याने या सणासुदीच्या घरगुती फराळापासून विविध प्रकारच्या मिठार्इंची घरात रेलचेल असते. परंतु, सध्याच्या काळात बहुतेक महिला आपला कामधंदा सांभाळून घरही सांभाळत असल्याने घरच्या घरी गोडधोड बनवणे साºयांनाच जमते, असे नाही. त्यामुळे फराळ आणि मिठाईचे बरेचसे पदार्थ बाहेरूनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. ही संधी साधून विविध बचतगटांनी फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी नियोजन सुरू केले असून, मिठाईवाल्यांनीही सणासुदीसाठी वेगवेगळ्या मिठाई बनविण्याचे काम सुरू केले आहे. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असा लौकिक असलेला दीपोत्सवाचा झगमगाट आणि गोडधोडाचे फराळ, नवनवीन वस्तू, कपडे आणि आनंदाच्या आठवणी अशी पारंपरिक व्याख्या बनलेली आहे. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच कुटुंबातील महिलांना घरगुती गोडधोड बनवायला वेळ मिळत नाही. परंतु, दिवाळ सणातील गोडवा कमी होऊ नये म्हणून बदलत्या काळानुसार घराघरांमध्ये बाहेरून दिवाळीचा फराळ करवून घेण्याची पद्धत रूढ होत असताना शहरातील विविध मिठाईच्या दुकानदारांनीही मिठाईसोबतच दिवाळीचा फराळही विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली आहे. मिठाई विक्रेते दिवाळीचा फराळ वेगवेगळ्या बचतगटांकडून आॅर्डर देऊन मागवत आहेत. तर काही बचतगट थेट ग्राहकांशी संवाद साधून आॅर्डर मिळवत आहेत. सध्या बाजारपेठेत नवरात्रीच्या प्रसादासाठी व देवीच्या पूजेसाठी लागणारी मिठाई व फराळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, यावर्षी जीएसटीच्या प्रभावाने विविध पदार्थांचे भाव वाढणार असल्याने मिठाईवाले मागणीच्या प्रमाणातच मिठाई तयार करण्याचे नियोजन करीत आहेत.दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या मिठाईला मागणी वाढली आहे. सणासुदीच्या दिवसात मिक्स मिठाईला अधिक मागणी असते. त्याचप्रमाणे पेढे, लाडू, काजू- कतली, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फीलाही मागणी वाढली आहे. - अजिज शेख, व्यवस्थापक, हाजी मिठाईबचतगटाला दरवर्षी ८० ते ९० किलो वेगवेगळ्या प्रकारचे फराळ तयार करण्याच्या आॅर्डर्स मिळतात. या आॅर्डर्सला दसºयापासूनच सुरुवात होत त्यापार्श्वभूमीवर नियोजन बैठक घेऊन नियोजन करण्यात येते.- मनीषा पवार, अध्यक्ष, रचना शिल्प बचतगटपारंपरिक ग्राहकांकडून दरवर्षीप्रमाणे मिठाई आणि ठराविक फराळांच्या पदार्थांची चौकशी सुरू झाली आहे. परंतु सध्या अनेक सोसायट्यांमधून महाराज मिठाई बनवून देण्याचे काम करीत असल्याने तसेच विविध पदार्थांवर जीएसटीही लागून असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी मागणीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.- मोहन चौधरी, संचालक, सागर सम्राट
तयार फराळाकडे वाढतोय ग्राहकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:57 PM