इंदिरानगर : मुंबई नाका ते दीपालीनगर समांतर रस्त्यावर कंटेनर तासनतास उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार त्रस्त नागरिकांनी केली आहे समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी? असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महामार्गालगत दोन्ही बाजूस समांतर रस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते लाखो रु पये खर्च करून करण्यात आले आहे. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा समांतर रस्त्यालगत दीपालीनगर, सूचितानगर, इंदिरानगर, राजीव नगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या परिसरातील नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करतात त्यामुळे दिवसभर मोठे प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु दीपालीनगर ते सूचितानगर या समांतर रस्त्यादरम्यान कंटेनरची रांगच लागलेली असते. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे बनले आहे. वाहनधारकांना या कंटेनरमुळे पुढील वाहने दिसण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे लहान मोठे अपघात घडत असतात तातडीने दीपालीनगर ते सूचितानगर समांतर रस्त्यावरील कंटेनरचालक आणि संबंधित गुदाममालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. समांतर रस्ता आधीच वाहतुकीसाठी कमी पडत असताना दीपालीनगर ते सूचितानगर समांतर रस्त्यावरच कंटेनर तासनतास उभे राहत असल्याने इंदिरानगरमधून निघणाºया वाहनधारकांना मार्गक्र म करणेही जिकिरीचे बनले आहे. समांतर रस्ता वाहतुकीसाठी असल्याने तातडीने रस्त्यावर उभे राहणारे कंटेनर हलवून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा तसेच कायमस्वरूपी तोडगा काढावा.- मंगेश नागरे, रहिवासी
दीपालीनगर मार्गावर कंटेनरच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:07 AM