सिन्नर : पूर्वभागातील वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे पत्र वावीच्या सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांनी योजनेच्या अध्यक्षांना दिले आहे. योजनेतील गावांना शुद्ध व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी पाणीपुरवठा समिती अध्यक्षांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. वावीसह ११ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा याजनेचे जलशुद्धीकरण केंद्र कोळगावमाळ येथे आहे. तेथून प्रक्रिया केलेले पाणी वावीयेथील मध्यवर्ती जलकुंभामध्ये आणले जाते व तेथून योजनेतील गावांना वितरित करण्यात येते. गेल्या महिना भरापासून योजनेतील गावांना टीसीएल विहिरीत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी अतिशय गढूळ असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनला असल्याचे सरपंच गावडे, उपसरपंच काटे यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांकडून दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. टीसीएलचा योग्य वापर करून शुद्ध पाणीपुरवठ्याच्यी विनंती करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील दूषित पाणीपुरवठा थांबला नसल्याकडे गावडे व काटे यांनी लक्ष वेधले. योजनेतील सहभागी असणाऱ्या वावीसह सर्व ग्रामपंचायती पाणीपुरवठा समितीकडे योजनेच्या संचलनासाठीचा सहभाग हिस्सा जमा करतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप पदाधिकायांनी केला आहे.शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणीग्रामस्थांकडून दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. टीसीएलचा योग्य वापर करून शुद्ध पाणीपुरवठ्याच्यी विनंती करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील दूषित पाणीपुरवठा थांबला नसल्याकडे गावडे व काटे यांनी लक्ष वेधले. योजनेतील गावांना पुरेसा व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र समितीकडून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:38 AM