शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बेकायदा धार्मिक स्थळ सुनावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:34 AM

महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहून अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहेत. त्यापैकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली.

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील सुमारे सहाशेहून अधिक धार्मिक स्थळे बेकायदा ठरविण्यात आली आहेत. त्यापैकी हरकती प्राप्त झालेल्या ४० प्रकरणांची आज महापालिकेत सुनावणी घेण्यात आली. बुधवारी (दि. २२) नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड या विभागांची सुनावणी होणार आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. काही धार्मिक स्थळे यापूर्वीच हटविण्यात आली आहेत. तथापि, दुसऱ्या टप्प्यातील मोहीम राबविण्यास विरोध करण्यात आला. यासंदर्भात मठ मंदिर बचाव समिती स्थापन झाली. या समितीने उच्च न्यायालयात महापालिकेने धार्मिक स्थळे बेकायदेशीर ठरविताना विहित कार्यपध्दती अनुसरली नसल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सर्वेक्षण करून हरकती मागविण्याचे आदेश दिले होते.महापालिकेने त्यानुसार सर्र्वेक्षण केले असून, ८९९ धार्मिक स्थळांपैकी एकूण ६४७ धार्मिक स्थळांबाबत शासकीय पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे महापालिकेने या ६४७ बेकायदा धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केली.२००९ पूर्वी बांधलेले तसेच २००९ नंतर झालेल्या धार्मिक स्थळांची विगतवारी प्रशासनाने केली असून, जे बेकायदा धार्मिक स्थळे स्थलांतरित होऊ शकतील त्यांची यादी वेगळी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हरकती मागवण्यात आल्या होत्या. यात १८४ हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या हरकतीची सुनावणी मंगळवारपासून (दि. २१) सुरू झाली आहे.आजही सुनावणीमंगळवारी (दि. २१) महापालिकेच्या मुख्यालयात ४० हरकतींची सुनावणी घेण्यात आली. यात सुरुवातीला ३६ हरकतदार उपस्थित होते, मात्र नंतर अन्य हरकतदारदेखील उपस्थित झाल्याने एकूण चाळीस हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.४अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि पोलीस निरीक्षक कारंजे यांच्या समितीने यासंदर्भात संबंधित हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले.४बुधवारी (दि.२२) नाशिक पश्चिम विभागातील १५ आणि नाशिकरोड विभागातील १० मिळकतींवरील हरकतींची सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर