शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू

By admin | Published: October 16, 2016 10:30 PM

ब्राह्मणगाव गट : भाजपाची पहिली बैठक संपन्न

 ब्राह्मणगाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्याने ब्राह्मणगाव जि. प. गटासाठी इच्छुक उमेदवारांनी भेटीवर जोर देऊन चाचपणी सुरु केली आहे. यासाठी येथील भाजपाची पहिली बैठक येथे संपन्न झाली.ब्राह्मणगाव गट हा महिला सर्वसाधरण आरक्षित झाल्याने नेतेमंडळी आपल्या अर्धांगिनीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यात विद्यमान सदस्य पप्पूतात्या बछाव यांनी पाच वर्षांतील कामांची माहिती देत चाचपणी करण्यात सुरुवात केली आहे. शिवसेनेतर्फे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गटात त्यांचा संपर्कमोठा आहे, तर भाजपातर्फे डॉ. विलास बच्छाव यांच्या पत्नी लता बच्छाव, तर भाजपाचे जिल्हा चिटणीस गजेंद्र चव्हाण यांच्या पत्नी अनिता चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.डॉ. विलास बच्छाव यांच्या पत्नी लता बच्छाव यांनी जिल्हा परिषद सदस्य पद भूषवले आहे. त्यांचाही गटात संपर्काचा दावा आहे. अनिता चव्हाण यांनीही जि. प. सदस्यपद भूषवले आहे. गजेंद्र चव्हाण यांनीही आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे केल्याचा दावा केला आहे. त्यांचा सामाजिक कामे, पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलने, पाणी, रस्ते, शेती प्रश्नांसाठी सतत लढा दिला आहे. त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. २००२ मध्ये जि. प. अध्यक्षपदासाठी अनिता चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती; मात्र यश थोडक्यात हुकले. उमेदवारीच्या तयारीत असलेले जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राघोनाना अहिरे यांच्या पत्नी सरपंच सरला अहिरे, लखमापूरचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य संजय देवरे यांच्या पत्नी यांचेही नावे चर्चेत आहेत.निवडणुकीला वेळ असला तरी मिटिंग, भेटीगाठी, बैठका सुरु झाल्या आहेत.यात पुन्हा ब्राह्मणगाव पंचायत गणासाठी ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे , माजी सरपंच सुभाष अहिरे, चेअरमन अरुण अहिरे, भाजपाचे अतुल अहिरे , सदस्य जगदीश अहिरे , चेअरमन संदीप अहिरे, सहकारी संस्थेचे संचालक कैलास अहिरे, उपसरपंच गोटीराम पगार इच्छुक आहेत. लखमापूर गणात भाजपाचे गजेंद्र चव्हाण यांनी दावेदारी केली आहे. अजूनही इच्छुकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पक्षीय उमेदवारीला महत्त्व असल्याने सर्व पक्षांचे श्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ब्राह्मणगाव गटात दोन गण आहेत, त्यात ब्राह्मणगाव गणात ब्राह्मणगाव, अजमीर सौंदाणे, कऱ्हे, कोळी पाडे, रातीर, कुपखेडा, नलकेस, तर लखमापूर गणात लखमापूर, धान्द्री, यशवंतनगर, वायगाव, सुराणे, लोणार वाडी, देवळाणे, रामतीर , सारदे आदि गावांचा समावेश आहे.विकासकामे अनेक झाली असली तरी अद्याप अनेक विकासकामे करण्यास वाव आहे. त्यात पाणी अडवणे , शिक्षणाचा स्तर उंचावणे , वृक्षारोपण, आरोग्य, शेतीसाठी ठोस कृती कार्यक्र म, बेरोजगारी, अशा अनेक समस्या उभ्या आहेत. (वार्ताहर)मालेगावच्या अमृतयोजनेचा शुभारंभमालेगाव : शहरासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अमृत योजनेचा ई-शुभारंभ मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला. मालेगाव महानगरपालिका सभागृहात ही व्यवस्था करण्यात आली होती.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी अमृत अभियान ही एक योजना आहे. सदर योजनेत देशभरातून सुमारे ५०० शहरांनी सहभाग घेतला आहे. यात राज्यातील ४३ शहरांचा सहभाग असून, पहिल्या दहा शहरात मालेगाव शहराचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून अमृत योजनेंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथून या योजनेचा ई-शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार आसीफ शेख, महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, उपमहापौर युनुस इसा, आयुक्त रवींद्र जगताप, स्थायी समिती सभापती एजाज बेग, नगरसेवक सुनील गायकवाड, पाणीपुरवठा उपअभियंता जहीर अन्सारी, संजय जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)