येवला : नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य आहे. मात्र, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रु ग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकार्यांना दिले.कोरोनाच्या पाशर््वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत येवला येथील शासकीय विश्राम गृह येथे भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.येवला शहरातील रु ग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोमॉर्बीड रु ग्णांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. रु ग्णांच्या तपासणीची संख्या अधिक वाढविण्यात येऊन कोमॉर्बीड रु ग्णांची आॅक्सिजन लेव्हलची तपासणी नियमित करून लक्ष ठेवण्यात यावे अशा सूचना देत मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर पुढील काळात अधिक दक्षता घेण्यासाठी ग्रामीण रु ग्णालयात कायमस्वरूपी सेंट्रल आॅक्सिजनसह लागणार्या आवश्यक त्या सुविधा तयार करण्यात याव्यात. ग्रामीण भागात गर्दी होणारया ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, गाविनहाय स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्या कार्यरत करण्यात येऊन गावपातळीवर विशेष लक्ष ठेऊन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावे असे भुजबळ यांनी सांगितले.बैठकीस आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारु ळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरिसंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक निबंधक एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचनापीक कर्ज, कर्जमाफी, मका खरेदी, वीजेचे प्रश्नांचा आढावा घेत उपस्थित शेतकर्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच मका खरेदीस शासनाने परवानगी दिलेली असून शंभर टक्के खरेदी पूर्ण करावी, शेतकरी कर्ज माफीचा लाभ शेतकर्यांना मिळवून देऊन त्यांना पीक कर्जाचे वाटप लवकरात करावे यासह सोळा गाव पाणी पुरवठा योजना, तसेच विजेच्या प्रश्नांबाबत आढावा घेऊन तक्र ारी निकाली काढण्याचे आदेश भुजबळ यांनी यावेळी दिले.
कोरोना रु ग्णांची संख्या आटोक्यात राहण्यासाठी आरोग्य तपासणी नियमित सुरू ठेवा : भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 6:33 PM
येवला : नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य आहे. मात्र, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रु ग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकार्यांना दिले.
ठळक मुद्देयेवला : आढावा बैठकीत अधिकार्यांना आदेश