शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मार्चअखेरीस ग्राहक आयोग खंडपीठाचे कामकाज सुरू

By admin | Published: January 31, 2015 1:02 AM

- आर. सी. चव्हाण

नाशिक : राज्य शासनाने मंजूर केलेले राज्य ग्राहक आयोग खंडपीठाच्या कामकाजास मार्चअखेरपासून सुरुवात होण्याची शक्यता मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष आऱ सी़ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली़ नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, ग्राहकांनी आपल्या तक्रारी संकेतस्थळावर नोंदविल्यास त्याचा फायदा होणार आहे़ तसेच आॅनलाइन तक्रारी आणि ई-फायलिंग यासाठी तज्ज्ञांच्या मदत मिळावी यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले़ चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, बँक आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांना आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत़ यामुळे ग्राहक कंपन्यांकडे आॅनलाइन तक्रार नोंदवतील तसेच ते वरिष्ठांकडेही तक्रारी मांडू शकतात़ या तक्रारीनंतरही ग्राहकांचे समाधान न झाल्यास कंपनीच राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचात ग्राहकाची तक्रार दाखल करतील़ त्यात ग्राहकाची तक्रार आणि कंपनीने ग्राहकांना दिलेले उत्तरही जोडण्यात येईल़ याचा न्यायालय व पक्षकार या दोघांनाही फायदा होईल व ग्राहकांनाही त्वरित निकाल देण्यात येईल़या पेपरलेस कारभारामुळे पक्षकार, वकील आणि न्यायालयाच्या वेळ आणि पैशांचीही बचत होऊन विश्वास वाढेल़ याबरोबरच न्यायालय ई -पेमेंटसाठीही आग्रही असून, राष्ट्रीयीकृत बँकेच्या मदतीने पक्षकारास किंवा न्यायालयात आर्थिक व्यवहार थेट आॅनलाइन पद्धतीने करता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ ग्राहक न्यायालयाच्या प्रत्येक कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ई-फायलिंग करण्याचा मानस असून, यामुळे जितका जास्त इंटरनेट, स्मार्टफोन, कॅमेरा या तंत्रज्ञानाचा वापर होईल तितके काम जलद होईल़ मात्र यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्ये गरजेचे असल्याचेही चव्हाण म्हणाले़ (प्रतिनिधी)