शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:23 PM

दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला.

ठळक मुद्देगंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झालीसंध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक हजार ५६० क्युसेक इतका विसर्ग झाला होता.

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहर व परिसरात दमदार संततधार सुरू होती; मात्र बुधवारी सकाळी नऊ वाजेनंतर संततधारेचा जोर ओसरला. यावेळी काही काळ लख्ख ऊनही पडले होते. दिवसभर अधूनमधून हलक्या श्रावणसरींचा वर्षाव नाशिककरांना चिंब करत राहिला. संध्याकाळपर्यंत ९ मि.मी इतक्या पावसाची नोंद होऊ शकली.दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. त्यामुळे दुपारी दोन वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली. दुपारी चार वाजेपर्यंत दोन हजार ६०० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू होता. एक हजार क्युसेकने विसर्ग कमी झाल्याने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीतही घट होऊ शकली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याखाली पाण्याची पातळी आली होती. दुपारी साडेचार वाजेपर्यंत नदीपात्रात अहल्यादेवी होळकर पुलाखालून ५ हजार ४३३ क्युसेक इतके पाणी प्रवाहित होते. पावसाचे प्रमाण संध्याकाळी कमी राहिल्याने होळकर पुलाखालूनही पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. तसेच गंगापूर धरणातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक हजार ५६० क्युसेक इतका विसर्ग झाला होता. त्यामुळे गोदावरीला निर्माण झालेली पूरसदृश स्थिती संपुष्टात आली.

गंगापूर धरणाचा जलसाठा मंगळवारी ९५ टक्क्यांवर होता. विसर्ग बुधवारी दुपारपर्यंत साडेतीन हजार क्युसेकने सुरू राहिल्याने जलसाठा ९२.१७ टक्के झाला असून, ५ हजार ४३३ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे. दिवसभर शहरात पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. पावसाच्या संततधारेने वाहतुकीचा वेगही मंदावला होता आणि बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत होता. बुधवारी बकरी ईदची शासकीय सुटी आणि पावसाच्या उघडीपीने नाशिककर संध्याकाळी कुटुंबासह घराबाहेर पडले. यामुळे शहरातील रस्ते, रेस्टॉरंट, बाजारपेठ, उद्याने गजबजली होती.

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिकgangapur damगंगापूर धरण