शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

कंत्राटास मंजुरी : काटेकोर अंमलबजावणीचे प्रशासनाला आदेश

By admin | Published: September 01, 2016 12:44 AM

शहरात धावणार नवीन घंटागाड्या

नाशिक : दोन वर्षांपासून मुदतवाढीच्या घेऱ्यात अडकलेल्या आणि विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडीच्या कंत्राटास महापालिका स्थायी समितीने अखेर बुधवारी झालेल्या सभेत हिरवा कंदील दाखविला. स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीमुळे लवकरच शहरात नवीन घंटागाड्या रस्त्यावर धावताना बघायला मिळणार आहेत. पाच वर्षांसाठी १७६ कोटी रुपयांच्या या कंत्राटास मान्यता देतानाच सभापती सलीम शेख यांनी घंटागाडी सुव्यवस्थित चालविण्याची जबाबदारीही प्रशासनावर निश्चित करत अटी-शर्तींनुसार काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले. स्थायी समितीच्या सभेत घंटागाडीच्या कंत्राटासंबंधी सुमारे तीन तास चर्चा झडली. सदस्यांनी काळ्या यादीत टाकलेल्या घंटागाडीच्या ठेकेदारांना पुन्हा ठेका देण्यास विरोध करतानाच अटी-शर्तींच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केल्या. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यावरही आरोप करण्यात आले. चर्चेअंती सभापती सलीम शेख यांनी निर्णय देताना सांगितले, शहर स्वच्छता ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. दोन वर्षांपासून घंटागाडीचा ठेका मुदतवाढीत अडकलेला आहे. मुदतवाढीच्या या खेळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होता कामा नये. घंटागाडीचा नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या काळात राबविण्यात आली. घंटागाडी अनियमित येणे, कचरा वेळेत उचलला न जाणे यांसारख्या तक्रारी वारंवार येत असतात. त्यामुळेच आयुक्तांनी घंटागाडीचा नव्याने ठेका देताना काही कडक अटी-शर्ती निविदेत नमूद केल्या आहेत.