नाशिक : तब्बल वर्षभरात एक किलोमीटर रस्त्याची खोदलेली एक बाजूही पूर्ण करू न शकलेल्या स्मार्टरोडच्या ठेकेदाराला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेली ३१ जानेवारीची डेडलाइन टळलीच, परंतु किमान मेहेर ते सीबीएसदरम्यान जवळपास काम पूर्ण झाले असून, हा टप्पा एक-दोन दिवसांत पूर्ण करू, असे ठेकेदाराने आयुक्तांना दिलेले आश्वासनदेखील हवेत विरले आहे. पाच दिवस उलटूनही हा टप्पा सुरू होऊ शकला नसून ठेकेदारासमोर प्रशासन पूर्णत: हतबल झाले आहे.मंगळवारी (दि.७) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांनी रस्त्याच्या कामांची पाहणी केली आणि ठेकेदाराला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम करण्यापूर्वी जंक्शनच्या जागा तरी ताब्यात द्या, असे साकडे घातल्याचे वृत्त आहे.कोणत्याही नियोजनाशिवाय शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि रहदारीच्या रस्त्याला स्मार्ट सिटीने हात घातला. परिसरातील शाळा, घरे, शासकीय कार्यालये, असा कोणताही विचार न करता गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. नागरिकांची छळवणूक थांबण्यासाठी प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसून संपूर्ण रस्त्याच्या कामाची मुदत संपण्याची वेळी आली तरी एका बाजूचा एक टप्पाही ठेकेदाराने पूर्ण करून खुला केलेला नाही. आणि ठेकेदाराच्या कलाने घेत प्रशासन मात्र त्याला मुदतवाढ देत असल्याची तक्रार होत आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वप्रथम या रस्त्याच्या कामाला भेट दिली.दृष्टिक्षेपात रस्तास्मार्ट सिटी कंपनीने निवडलेल्या पथदर्शी रस्त्याची लांबी अवघी १.१ किलोमीटर असून, स्मार्टरोडसाठी १७ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. रस्त्याच्या खाली गटारी, केबल असे सर्वकाही असणार आहे. रस्त्याच्या कडेला पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, लॅण्ड स्कॅपिंग आणि फ्री वायफाय अशा सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे.४स्मार्ट रोडच्या कामाबाबत पालिका प्रशाासनाकडून प्रयत्न केले जात असतांना संबंधित ठेकेदार मात्र वारंवार कामाची मुदत वाढवून मागत असल्याने रस्त्याचे काम लांबले आहे.मंगळवारी (दि.५) महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच पोलीस आयुक्तरवींद्र सिंगल यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यातून ठेकेदाराला तंबी देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराच्या कलाकलाने घेत डाव्या बाजूचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. जंक्शन हॅण्डओव्हर करण्यात आल्यानंतर २८ दिवसांत काम पूर्ण करण्यात येईल, असे महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.४तथापि, रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हे स्पष्ट करणे अत्यंत सोयीने टाळले असल्याने नागरिकांना आणखी किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार हा मात्र प्रश्नच आहे. आयुक्तद्वयींच्या पाहणी दौºयात सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, शहर अभियंता संजय घुगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
ठेकेदारासमोर प्रशासन हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 1:51 AM
तब्बल वर्षभरात एक किलोमीटर रस्त्याची खोदलेली एक बाजूही पूर्ण करू न शकलेल्या स्मार्टरोडच्या ठेकेदाराला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेली ३१ जानेवारीची डेडलाइन टळलीच, परंतु किमान मेहेर ते सीबीएसदरम्यान जवळपास काम पूर्ण झाले असून, हा टप्पा एक-दोन दिवसांत पूर्ण करू, असे ठेकेदाराने आयुक्तांना दिलेले आश्वासनदेखील हवेत विरले आहे. पाच दिवस उलटूनही हा टप्पा सुरू होऊ शकला नसून ठेकेदारासमोर प्रशासन पूर्णत: हतबल झाले आहे.
ठळक मुद्देरखडलेला स्मार्टरोड : सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ बंद करणार? कोंडी कायम