शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

प्रशासनाविरोधात ठेकेदार एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:06 PM

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मक्तेदारांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर आता सर्व मक्तेदार एकवटले असून, त्यांनी येत्या २२ आॅगस्टला आमरण उपोषणाची तयारी केली आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मक्तेदारांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर आता सर्व मक्तेदार एकवटले असून, त्यांनी येत्या २२ आॅगस्टला आमरण उपोषणाची तयारी केली आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी (दि. १०) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांच्या कक्षात सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, मजूर सहकारी संस्था संचालक तसेच नोंदणीकृत ठेकेदार यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या पदाधिकाºयांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर गरमागरम चर्चा झाली. गेल्या चार महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने बेरोजगार अभियंते, मजूर संस्था संचालक व नोेंदणीकृत ठेकेदार हवालदिल व कर्जबाजारी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या कामांसाठी घेतलेले उसनवार साहित्य उदा. सीमेंट, पत्रे, स्टील, वाळू पुरवठादार पैसे नसल्याने सातत्याने त्यांच्या मागे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने दिलेले धनादेश दोन दिवसात वटण्याची कार्यवाही करावी, अन्यथा कर्जबाजारी ठेकेदारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर राहील, असा निर्वाणीचा इशारा मक्तेदारांनी दिला होता.जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने न वटलेल्या सुमारे ५७ कोटींच्या धनादेशाच्या चार महिन्यांच्या व्याजासह मक्तेदारांची रक्कम तत्काळ मिळावी, ही प्रमुख मागणी मक्तेदारांची आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीस बेरोजगार अभियंता संघटनेचे संस्थापक योगेश कासार, जिल्हाध्यक्ष आर. टी. शिंदे, कोषाध्यक्ष विनायक माळेकर, सदस्य संदीप वाजे, चंद्रशेखर डांगे, अजित सकाळे, राहुल ढगे, राहुल गांगुली, जिल्हा मजूर संचालक शशिकांत आव्हाड, मजूर संस्था प्रतिनिधी उत्तम बोराडे, आप्पा दराडे आदी उपस्थित होते.