नायगाव: सिन्नर तालुक्याच्या नायगाव खोऱ्यात वीज दुरुस्तीच्या कामावेळी वीज कर्मचाºयाने ठेकेदाराला मारहाण केल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांनी काम बंद आंदोलनास प्रारंभ केला. वीज वितरणकडून संबंधित कर्मचाºयास तातडीने निलंबीत करण्यात आले. दरम्यान, या वादात गेल्या सहा दिवसांपासून नायगाव खोºयातील वाड्यावस्त्या अंधारात चाचपडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.सोमवारी सायंकाळी वादळी पावसामुळे नायगाव खोºयातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर गावठाण हद्दीतील वीजपुरवठा गुरुवारी रात्री सुरु करण्यात आला होता. मात्र वाड्या-वस्त्यांवरील वीज दुरूस्तीचे बाकी होते. या कामावेळी वीज कर्मचारी व ठेकेदारांमध्ये गुरुवारी झालेल्या हाणामारीचा फटका वाड्यावस्त्यांवरील शेतकºयांना बसला. यामुळे दुरूस्तीचे काम थांबल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. शेत-शिवारातील सहावा दिवसही गेला आंधारातच गेला.
ठेकेदार व कर्मचारीत वादात नायगाव खोरे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 6:22 PM