नाशिक : भारत विकास परिषद नाशिक मिडटाउन शाखेतर्फे देश-विदेशातून सुमारे ६० लाख रुपयांच्या १७० ऑक्सिजन मशिन्स आणून, त्या ऑक्सिजन मशिन्स वेगवेगळ्या कंपन्यांना, हॉस्पिटल्सला, तसेच गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवाकार्यासाठी सॅमसोनाइट इंडस्ट्रिज, तैनवाला फाउंडेशन, रामबंधू मसाले, मुंगी इंजिनीअरिंग या उद्योगांसह शाखेचे सभासद उमेश राठी, अपर्णा राठी, नंदू अहिरे, अजित जैन, अनिता जैन, दीपक रत्नपारखी, अजय आगाशे, शेखर ओढेकर, सुभाष बडगुजर, प्रवीण कुलकर्णी, सुरेश पाटील, शरद बेदमुथा, संतोष कुलकर्णी, रवि देशपांडे, संजीव अडगांवकर, दिलीप पाटील, संजय गोवांडे, दिलीप वराडे आदींनी अर्थसाहाय्य, तसेच ऑक्सिजन मशीन वितरण केंद्र चालविण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय, वैतरणा येथील जिल्हा परिषदेचे ग्रामीण रग्णालय, देवळाली कॉन्टीनेंटल हॉस्पिटल आदी ठिकाणी ऑक्सिजन पाइपलाइनसाठी सॅमसोनाइट कंपनीकडून सुमारे ५० लाखांचा निधी उपलब्ध करून ३०० बेडच्या ऑक्सिजन पाइपलाइनचे काम करून देण्यात आले असून, न्यू बिटको हॉस्पिटल येथे सुमारे ७० जंबो सिलिंडर एवढे रोज ऑक्सिजन बनेल, असे ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करण्यात येत आहे. यात प्रशांत पाटील, अरविंद महापात्रा, अशोका ग्रुप, नाशिक आयटी असोसिएशन, सीओईपी माजी विद्यार्थी नाशिक असोसिएशन, जाएंट नाशिक प्राइड, अरविंद कुलकर्णी, नदीम यांचेही सहकार्य लाभले आहे.
===Photopath===
300521\30nsk_1_30052021_13.jpg
===Caption===
भारत विकास परिषदेकडून ककरण्यात आलेली मदत