नाशिक : ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या रुग्णांना किमोथेरपी देताना पूर्वी हृदयाच्या काही भागांशी त्याचा संपर्क आल्याने हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असायची. पण आता नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे हा त्रास कमी झाला असून, यात किमोथेरपीमुळे होणारे परिणाम टाळण्यावर भर दिला जात आहे. ब्रेस्ट कॅन्सरसह मधुमेह, रक्तदाब, मोनोपॉज अशा साºयांना एकत्रच सामोरे जाताना महिलांना त्रास होतो. पण हा त्रास वेळेवर औषधोपचार, आहार, व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन याद्वारे सहजतेने हाताळू शकतो असा सूर क्युरी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित परिषदेत व्यक्त करण्यात आला. मुंबई नाका येथील नवीन हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि.२५) पार पडलेल्या या परिषदेत ‘ब्रेस्ट कॅन्सर उपचारापश्चात होणारे परिणाम’ या परिसंवाद सत्रात डॉ. सोना नाग, डॉ. राहुल बावीस्कर, डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, डॉ. सुचित्रा मेहेता यांनी भाग घेतला. मानवता कॅन्सर सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल वुमन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह, नाग फाउंडेशन यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर होणारे परिणाम (स्तनाचा कडकपणा, हातापायाला मुंग्या येणे) हे उपचार, तत्कालीन परिस्थिती यांच्यामुळे होतात व उपचार पूर्ण होताच ते नाहीसेही होतात, असे यावेळी सांगण्यात आले. गोळ्यांचा नियमित डोस, आहारा कॅल्शियमचे प्रमाण वाढविणे, व्यायाम, योग्य आहार, पथ्यांचे पालन या गोष्टींवर प्राधान्याने भर द्यावा, असे यावेळी सांगण्यात आले. शेफ नीलेश लिमये यांनी आरोग्यदायी पदार्थांविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यानंतर रेबेका डिसूझा व अश्विनी त्रिपाठी यांनी फिजिओथेरपीबद्दल मार्गदर्शन केले. मुग्धा सातारकर, अर्चना विषये, वंदना अत्रे यांनी यावेळी स्वानुभावातून कॅन्सरच्या लढ्याची कहाणी कथन केली. बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केले. परिषदेत दिवसभरात ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. राज नगरकर यांनी ‘ब्रेस्ट कॅन्सरची सद्यस्थिती व भविष्य’ या विषयावर माहिती दिली. त्यानंतर ‘ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक तपासणी व पाठपुरावा’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात डॉ. अलोक पावसकर, डॉ. समाधान पवार, डॉ. आदित्य आढाव, डॉ. सागर भालेराव, डॉ. विजय पालवे यांनी भाग घेत उपयुक्तमाहिती दिली.
नवसंशोधनामुळे रेडिओथेरेपीचा हृदयावरील परिणाम नियंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:34 AM
ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या रुग्णांना किमोथेरपी देताना पूर्वी हृदयाच्या काही भागांशी त्याचा संपर्क आल्याने हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असायची. पण आता नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे हा त्रास कमी झाला असून, यात किमोथेरपीमुळे होणारे परिणाम टाळण्यावर भर दिला जात आहे. ब्रेस्ट कॅन्सरसह मधुमेह, रक्तदाब, मोनोपॉज अशा साºयांना एकत्रच सामोरे जाताना महिलांना त्रास होतो. पण हा त्रास वेळेवर औषधोपचार, आहार, व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन याद्वारे सहजतेने हाताळू शकतो असा सूर क्युरी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित परिषदेत व्यक्त करण्यात आला.
ठळक मुद्दे नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे त्रास कमी‘ब्रेस्ट कॅन्सर उपचारापश्चात होणारे परिणाम’ परिसंवाद महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन