नाशिक : राज्यातील खासगी शिकवणी व कोचिंग क्लासेस संस्थांचे नियंत्रण व नियमनासाठी येत असलेल्या कायद्यामध्ये इंटिग्रेटेड क्लासेस आणि विविध सरकारी व अनुदानित शाळांमध्ये नोकरी करणाºया दुहेरी शिक्षकांवर नियंत्रण आणावे. तसेच राज्यभरात कार्यरत असलेल्या कोचिंग क्लासेस चालकांच्या प्रोफेशनल टीचर्श असोसिएशनला (पीटीए) परिषदेची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी टीचर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी केली आहे.नाशिक येथील संदीप फाउंडेशनमध्ये कोचिंग क्लासेस चालकांची संघटनेच्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील जिल्ह्यांमधील संघटनांचे जिल्हाध्यक्षांनी सहभागी होत कोचिंग क्लासेस चालकांच्या समस्यांवर विचार-विनिमय केला. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी उपस्थित क्लासेस चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण ठाकूर, कायदेशीर सल्लागार रवींद्र फडके, नाशिकचे अध्यक्ष जयंत मुळे, सीए लोकेश पारख, सचिव कैलास देसले, यशवंत बोरसे, विलास सानप आदी उपस्थित होते. राज्य शासनाने कोचिंग क्लासेसच्या नियंत्रण व नियमनासाठी कायदा प्रस्तावित केला असून, या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी १२ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली असून, या समितीत खासगी क्लासेस संघटनेच्या चार सदस्यांना सदस्य स्थान देण्यात आले आहे. ही खासगी क्लासेस चालकांसाठी दिलासादायक बाब असून, त्यामुळे क्लासेस चालकांची बाजू समितीसमोर प्रभावीपणे मांडता येणार असल्याचे भूयार यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालयीन शिक्षकांवर नियंत्रण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 1:20 AM