जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील मौजे पिंपरी व पाटोदा येथील वादग्रस्त अतिक्रमित केलेला शिवरस्ता खुला केल्याने २३० शेतकऱ्यांचा रहदारीसह मालवाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी व पाटोदा शिवारामधील शेतकरी शेतीमाल घेऊन जाऊ शकत नव्हते. जवळपास दोन्ही शिवारामधील दोनशेहून अधिक शेतकरी वंचित होते.मौजे पिंंपरी व पाटोदा अतिक्रमण असलेला शिवरस्ता दोन्ही शिवारमधील शेतकरी समन्वयातून अखेर खुला करण्यात आला. वादग्रस्त मौजे पिंपरी व पाटोदा शिवरस्ता अतिक्रमण खुला करताना येवला तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, भूमी अभिलेख सानप व कर्मचारी, पाटोदा मंडळ अधिकारी चेतन चादवार, तलाठी श्रीमती शेटे, बोडके, भावराव कोतवाल, शिरसाठ, पाटोदा बीटाचे दौलत ठोंबरे, बनकर, पिंपरी सरपंच सोनाली कुदळ, उपसरपंच अशोक गुंड, भगवान ठोंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश पानसरे उपस्थित होते.बऱ्याच दिवसांपासून या रस्त्याचा वाद होता. पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, तालुका भूमिलेख अधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले की, शेतकऱ्यांच्या हद्दीत शिव रस्ता आला तर तो काढून देण्यात येईल. यात सर्व शेतकऱ्यांनी मान्यता दिली. सर्व शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट असल्याने त्याला मान्यता देऊन रस्ता खुला करण्यास परवानगी दिली.- प्रमोद हिले, तहसीलदार, येवला
पिंपरीतील वादग्रस्त अतिक्रमित शिवार रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 10:47 PM
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील मौजे पिंपरी व पाटोदा येथील वादग्रस्त अतिक्रमित केलेला शिवरस्ता खुला केल्याने २३० शेतकऱ्यांचा रहदारीसह मालवाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी व पाटोदा शिवारामधील शेतकरी शेतीमाल घेऊन जाऊ शकत नव्हते. जवळपास दोन्ही शिवारामधील दोनशेहून अधिक शेतकरी वंचित होते.
ठळक मुद्देतोडगा : २३० शेतकऱ्यांचा रहदारीचा मार्ग मोकळा