नाशिकमध्ये कॉँग्रेसच्या गटनेतापदाचा वाद सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 07:02 PM2019-07-25T19:02:49+5:302019-07-25T19:05:35+5:30
नाशिक- महापालिकेत कॉँग्रेस पक्षाच्या गटनेता म्हणून नियुक्त होऊनही अंतर्गत वादामुळे डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती झालेली नाही. सध्याचे गटनेता शाहु खैरे यांनी पद सोडण्यास विरोध केल्याचे प्रमुख कारण असल्याने हा वाद शिलगतच आहे. आता पक्ष श्रेष्ठी बदलले असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींचा कोणताही निर्णय आपल्याला मान्य असेल असे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले.

विशेष म्हणजे कॉँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समक्ष शाहु खैरे यांनी राजीनामा देण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात राजीनामा दिला नसल्याचा आरोप करीत डॉ. पाटील यांनी महापौर रंजना भानसी देखील कॉँग्रेस पक्षात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला.
कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सध्या शाहु खैरे आहेत काही महिन्यांपूर्वी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्याचे पत्र पक्षाने दिले होते. मात्र महापौरांनी ते दोन महासभा दडपून ठेवले असा पाटील यांचा आरोप आहे. ज्या महासभेत महापौरांनी गटनेतापदाची औपचारीक घोषणा करण्याची तयारी दर्शविली. त्या सभेत शाहु खैरे यांनी आक्षेपाचे पत्र दिले. पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलवून गटनेता निवडला जातो परंतु अशी प्रक्रीया राबविली गेली नसल्याचे खैरे यांचे म्हणणे होते. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी डॉ पाटील यांच्या नावाची घोषणा केलीच नाही. गुरूवारी (दि.२५) डॉ. हेमलता पाटील यांनी यासर्व घटनांना उजाळा दिला. तसेच आपल्याला गटनेता म्हणून घोषीत करण्यास टाळटाळ करणाऱ्या महापौर त्यांच्या पक्षाच्या गटनेत्यांची महासभेत घोषणा होण्या आधीच सर्व नियम पायदळी तुडवून कसे काय सुविधा देऊ शकतात असा प्रश्नही त्यांनी केला.