नाशिक : अभियांत्रिकी पदविकेच्या २०१६-१७ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिलेल्या विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील सुविधा कें द्रांवर अभियांत्रिकी पदविका प्रवेशाला सुरुवात झाली आहे. संचालनालयाने संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.प्रवेशप्रक्रियेकरिता सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना अॅप्लिकेशन किटचे वितरण, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार आॅनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी, आॅनलाइन अपलोडिंग, स्कॅनिंग, इंटरनेट, वायफाय सुविधा, फॉर्म पोचपावतीची प्रत आदि सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रक्रियेद्वारे फॉर्म भरून झाल्यानंतर सुविधा केंद्रावर जाऊन मूळ कागदपत्रे दाखवून प्रवेश अर्ज निश्चित करणे अनिवार्य आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना प्रवेशासून वंचित राहावे लागणार आहे. या वर्षापासून नवीन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत त्यानुसार प्रवेशप्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला थेट प्रवेश मिळणार नसल्याचे संचालनालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकीसाठी सुविधा केंद्र सुरू
By admin | Published: June 19, 2016 11:12 PM