तालुक्यातील झोडगे आणि दाभाडी डीसीएचसीवर रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी दिली. तालुक्यातील रुग्णांना बेड उपलब्ध होत असून काही गंभीर रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल केले आहेत. मालेगाव तालुक्यात दाभाडी, रावळगाव, पिंपळगाव, पाटणे, कळवाडी, जळगाव (गा) आणि ढवळेश्वर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यात दाभाडी येथे ५४, रावळगावला ४६, पिंपळगावला २८, पाटणेला २२, कळवाडीत १९ आणि जळगाव (गा) आणि ढवळेश्वर येथे प्रत्येकी १७ रुग्ण आहेत. २ एप्रिलपर्यंत ४ हजार ९२९ बाधितांवर उपचार केले. त्यातील ४ हजार २४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्व प्रभावित गावांमध्ये जास्तीत जास्त टेस्टिंग केल्या जात आहेत. कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्यांचे आशा वर्कर मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. त्यात मिळणाऱ्या बाधितांवर उपचार केले जात आहेत. मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथे मातोश्री हॉस्पिटल संलग्न बारा बलुतेदार मित्र मंडळातर्फे ३५ बेडचे राम रहीम कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
मालेगाव तालुक्यात सुविधा दिलासाजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:15 AM