नाशिक : शिक्षणाचे खासगीकरण करून हे क्षेत्र भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असून शैक्षणिक क्षेत्राचे खासगीकरण रोखण्यासाठी शिक्षण संस्थाचालक, शिक्षक व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी केले. ७ मार्चला सांगलीत शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अनेक संस्थाचालकांनी पदरमोड करून शाळा चालवल्या असून या शाळा बंद पाडून भांडवलदारांच्या शाळा चालवण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करीत अनुदानित शाळा भविष्यात दुर्बल घटक शिक्षण प्रवाहातून बाजूला पडण्याचा धोका असल्याचे मत शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे मत आहे. त्यामुळे भांडवलदारांच्या विळख्यातून शिक्षण संस्था वाचवण्याच्या चळवळीत शिक्षण संस्था चालकांनसह शिकक्षक न पालकांनीही सहाभगी व्हावे, असे आवाहन संस्थाचालक महामंडळाने केले आहे.
--
संस्था चालकांच्य मागण्या
- वेतनेत्तर अनुदान चार टक्के आणि इमारत भाडे वाढ करावी.
- शिक्षक, शिक्षकेत्तर भरतीवरील बंदी उठवावी.
- शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे.
- शिक्षकेत्तर नियुक्तीतील जाचक अटी रद्द करून पूर्ववत भरती प्रक्रिया राबवावी.