या अधिवेशनात प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया,एमएससीआयटी बाबतची अडचण, शासन निर्णय,चट्टोपाध्याय व निवड श्रेणी प्रस्ताव,वैद्यकीय बिले मंजुरी व निधी उपलब्धता, मुख्याध्यापक पदोन्नती आदी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.राज्यस्तरीय विषयांवर बोरसे व जिल्हास्तरावरील विषयावर कांदळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, सुनिल भांमरे, प्रकाश अहिरे,बुध्दसिंग ठोके,साहेबराव पवार, प्रशांत वाघ, सुनिल सांगळे, तालुका महिला अध्यक्ष वैशाली खैरनार व शिक्षक उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्षपदी वाघमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. त्यात जिल्हा उपाध्यक्ष श्रावण वाघ,जिल्हा प्रतिनिधी संदीप काकड,तालुका नेते शिवाजी बर्गे,तालुका अध्यक्ष अशोक कासार, तालुका सरचिटणीस सुकदेव वाघ,कार्याध्यक्ष शिवाजी जाधव,कोषाध्यक्ष धारासिंग राठोड,तालुका उपाध्यक्ष सचिन सानप व दादासाहेब बर्गे,कार्यालयीन चिटणीस संदीप ओहोळ यांचा समावेश आहे.
प्राथमिक शिक्षक संघाच्या सिन्नर शाखेचे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 5:36 PM