शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दीक्षांत समारंभ : मालेगावचा यशवंत बोरसे, साताऱ्याची एकता पवार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी

By admin | Published: February 11, 2015 11:43 PM

पोलीस अकादमीला स्वायत्तता : फडणवीस

नाशिक : विस्तार व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीला स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे़ अकादमीत नवीन निवासस्थाने, क्लासरूम, खुले सभागृहाबरोबरच इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १११व्या तुकडीच्या दीक्षात संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी मालेगावचा यशवंत बोरसे व साताऱ्याची एकता पवार यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़फडणवीस पुढे म्हणाले की, दहशतवाद, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे अशी नवी आव्हाने पोलीस दलासमोर आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांना ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई-प्रशिक्षण, वरणगाव येथे पोलीस ट्रेनिंग स्कूल, पोलिसांना पदोन्नती ऐवजी 30 टक्के इन्सेंटीव्ह देण्यात येणार आहे़ १११व्या तुकडीतील ५४२ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांमध्ये १३२ महिलांचा समावेश आहे. या महिला अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाला शक्ती आणि मानवतेचा चेहरा प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या कामगिरीने आणि वर्तनाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. जनतेचे रक्षक म्हणून समाजात वावरताना पीडिताना आणि वंचितांना न्याय देण्याचे कार्य करावे. सेवाभावनेतून कार्य करताना मानवतेच्या भावनेने समाजाकडे पहावे आणि सतत कर्तव्यदक्ष रहावे. दहशतवादी नवे तंत्र घेऊन आव्हाने उभे करीत असल्याने पोलिसांना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस अकादमीने २२ हजारांहून अधिक सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस दलाला दिले आहेत. सरकारनेही पोलिसांचे निवासस्थान, फॉरेन्सिक युनिट लॅब आदिंबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पोलीस दलाचे आधुनिकीकरणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी व्यावसायिक वृत्ती अंगी बाळगीत प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जावे, असे आवाहन केले. या दीक्षांत समारंभाची सुरुवात १११व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या शानदार संचलनाने झाली. संचलनाचे नेतृत्व नीलेश दाबेराव आणि मंगला खाडे यांनी केले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, अपर पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम आदिंसह पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)