दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राहुल आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, संजय पडोळ, सदाशिव शेळके, कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सर्व संचालक , युनियन अध्यक्ष सुनील कावळे आदींच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्यावेळी आमदार सानप बोलत होते. प्रारंभी दिलीप देशमुख, अशोकराव संधान, तानाजी बर्डे, बापू जाधव, मदनराव केदार आदींच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले.आमदार सानप यांनी कादवाची वाटचाल प्रतिकूल परिस्थितीत दिमाखात सुरू असल्याचे गौरवोद्गार काढले. कादवाने सर्वाधिक भाव व वेळेत पैसे दिले आहेत; मात्र केवळ साखर उत्पादनातून कारखाने चालविणे अवघड आहे. म्हणूनच केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पाबाबत पॅकेज जाहीर केले असून कादवाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तालुक्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी नियोजन करण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील धरणातील पाण्याचे नियोजन करताना लाभधारक शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कमी करू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, पाणीप्रश्नावर सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, यू.पी. मोरे, भास्कर भगरे, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, विश्वनाथ देशमुख, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, सुनील केदार, सुभाष शिंदे, सुनील कावळे आदींसह सभासद, कारखान्याचे अधिकारी कामगार उपस्थित होते.गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्नकारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी यंदा कादवाने प्रतिदिन २००० मेट्रिक टन गाळप करीत तीन लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. कादवाने एफआरपी अदा केली आहे. साखर उतारा वाढावा यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून, एक बॉयलर, टर्बाइन व मिल टाकल्यास दररोज २५०० मेट्रिक टन गाळप होणे शक्य होणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. शेतकºयांनी पाणी मागणी फॉर्म भरावे ,कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन शेटे यांनी केले.
कादवाच्या संचालक मंडळाला साथ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:54 AM
दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
ठळक मुद्देबाळासाहेब सानप : कादवा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ