नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वेग जुलै महिन्याच्या प्रारंभापासून भयावह वेगाने वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रारंभीचे ५ हजार रुग्ण होण्यास मार्च अखेरपासून जुलैच्या प्रारंभापर्यंत तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागला. तर त्यानंतरचे पाच हजार बाधित हे केवळ १७ दिवसात झाले असल्याने जिल्ह्यातील कोरोनाचे संकट जुलै महिन्यात अधिकच गहिरे झाल्याचे दिसत आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णबाधित होण्याचा वेग मे महिन्याच्या तुलनेत आठ पट, तर जून महिन्याच्या तुलनेत चौपटीने वाढला आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेसह आरोग्य सचिव तसेच मंत्रिमंडळापर्यंतची यंत्रणेलादेखील नाशिककडे लक्ष केंद्रित करावे लागले आहे. त्यामुळेच नाशिकच्या दोन मंत्र्यांनीदेखील नाशिकमध्ये ठाण मांडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. जिल्ह्यात प्रारंभी कसोशीने लॉकडाऊन पाळल्याने मार्चअखेरपर्यंत बाधित सापडला नव्हता. त्यानंतर प्रारंभीच्या १००० रुग्णापर्यंतपोहोचण्यास २६ मेपर्यंत दोन महिन्यांचा काळ लागला. त्यानंतरचा हजारी टप्पा २० दिवसांनी १५ जूनला तर त्यापुढचा तीन हजारांचा टप्पा नऊ दिवसांत गाठला आहे.महिनाभरात सात हजारनाशिक महानगरात जूनच्या उत्तरार्धात बाधितांचा वेग प्रचंड वाढला. त्यामुळे २४ जूनला तीन हजारांवर गेलेला बाधितांचा आकडा अवघ्या महिनाभराच्या आत २१ जुलैला थेट १० हजारांवर पोहोचला आहे. म्हणजे अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत बाधितांमध्ये तब्बल सात हजारांची वाढ झालेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित 10000
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 1:08 AM