नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारी (दि. १०) सलग दुसऱ्या दिवशी दुहेरी आकड्यात, अर्थात २० वर पोहोचली आहे. त्यात १४ बाधित नाशिक शहरातील असून, ग्रामीणचे तीन, जिल्हाबाह्य दोन, तर मालेगाव मनपाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी सातत्य असताना पावसानेही सलग दुसऱ्या दिवशी दुहेरी आकडा राखल्याने चिंता कायम राहिली आहे.जिल्ह्यात बुधवारी ९, तर गुरुवारी बाधितांची संख्या १९ वर पोहोचली होती. शुक्रवारी (दि. १०) वाढीचा वेग कायम असल्याने आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनदेखील अधिक सतर्क झाले असून, चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोना प्रलंबित अहवालांची संख्या २०२ झाली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे १३९, नाशिक मनपाचे ४२, तर मालेगाव मनपाचे २१ अहवाल प्रलंबित आहेत.उपचाराधीन झाले ७१वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचाराधीन रुग्णसंख्येत वाढ होण्याचा प्रकार सलग दुसऱ्या दिवशी कायम असल्याने उपचाराधीन रुग्णसंख्या ७१ वर पोहोचली आहे. त्यात ५१ रुग्ण नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण १०, जिल्हाबाह्य ६, तर मालेगाव मनपातील ४ रुग्णांचा त्यात समावेश आहे. बहुतांश रुग्णांकडून घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले असले तरी काही रुग्ण काळजीपोटी रुग्णालयात दाखल होऊ लागले आहेत.पॉझिटिव्हिटी रेट २.१५ टक्केजिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यावर कायम असला तरी गुरुवारी हा दर दोन टक्क्यांचे नियंत्रण ओलांडून २.४६ टक्के, म्हणजेच अडीच टक्क्यांच्या नजीक पोहोचला होता. त्यात अल्पशी घट झाली असली तरी हा पॉझिटिव्हिटी दर २.१५ टक्क्यांवर कायम आहे. त्यात नाशिक मनपा ३.२१ टक्के, जिल्हा बाह्य ८ टक्के, तर नाशिक ग्रामीण ०.६८ टक्क्यांवर आहे.असा वाढला बाधित आकडा०३ जून - ४०४ जून - ३०५ जून - ८०६ जून - ८०७ जून - ८०८ जून - ७०९ जून- १९१० जून- २०
कोरोना बाधित २० वर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 12:54 AM