नाशिक : गेले काही महिने संपूर्ण जग नॉवेल कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. यामुळेसर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपल्या सर्वाच्या हयातीतली ही पहिलीच एवढी मोठी महामारी आहे. यामूळे आपल्याला अनेक नवनवीन गोष्टीना सामोरे जावे लागत आहे लौकडाऊन, सोशल डीस्टेस, क्वारेटाईन, चेहराला मास्क लावुन फिरने सॉनिटायाझर चा वापर करणे इ. यामुळे आपण कोरोनाला दुर ठेवण्यासाठी जवळ जवळ दोन महिने घरातच बसून आहोत. नोकरी नाही , काम नाही, मित्रमंडळी नाही, कटटा नाही ,गप्पा नाही ! पण सतत टीही व वृत्तपत्रामध्ये एकच बातमी करोना आता ज्या आजारापासून लांब राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याने हळूहळू सतत होणारी भडिमारामुळे आपल्या सर्वांच्या मनात प्रवेश केला आहे. म्हणूनच सरकारी व सामाजिक संस्थांनी मानसिक आधारासाठी टोल फ्री हेल्पलाईन्स चालु केल्या आहेत. संशोधनामध्ये देखील असे आढळले आहे की या महामारी मूळ चिंता रोग व औदासिन्याचे प्रमाण वाढले आहे.नियमित औषध उपचार चालू असल्यामुळे बहुतांश स्कीझोफ्रेनियाच्या रूग्णाची परिस्थिती,सिर असते पण लॉंकडाऊन च्या काळात गावात कडच्या, खेडोपाडाचच्यारूग्णांना वेळेवर औषधे न मिळाल्या मुळे आजार परत वाढल्या चे जाणवले. काही नाते वाईकांनी गोळ्या पुरला पाहिजे म्हणून दिवसातून तीन वेळा न देता फक्त एकदाच गोळ्या दिला. दिल्या पुरेसे औषध न मिळाल्यामुळे देखील काही रुग्णांचा आजार बडवलास्किझोफ्रेनिया या रुग्णांना प्रामुख्याने भास व संशय वाढण्याची लक्षणे दिसतात या काळात आजार वाढल्यामुळे काही रुग्णांना असे भास होऊ लागले आहेत की लोक मुद्दाम आपल्याला कोरोना होण्यासाठी ते जीवजंतू माझ्या अन्न पाण्यात मिसळत आहेत याचाच परिणाम म्हणजे इतरांसोबत वाढणारे वाद-विवाद चिडचिड आणि कधीकधी होणारी हिंसानोकरी किंवा उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे अनेक व्यक्ती सध्याच्या काळात घरात बसून आहेत स्किझोफ्रेनिया चा आजार वाढण्यासाठी ही परिस्थिती सुद्धा कारणीभूत ठरली आहे येण्याजाण्याचे साधन नसल्यामुळे व सरकारने जाहीर केलेल्या कडक नियमांचे पालन हे प्रत्येक सामान्य व्यक्तीला करणे शक्य होईलच असे नाही त्यामुळे अनेकांच्या मनात नियमित उपचार घेण्याची इच्छा असून सुद्धा डॉक्टर पर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही पण बदलत्या काळाबरोबर आणि परिस्थितीनुरूप वागणे हे नेहमीच फायद्याचे असते त्यामुळे जसे शक्य होईल तसे प्रयत्न डॉक्टर सुद्धा करत आहेत. डॉक्टर फोनवर देखील आपली सेवा उपलब्ध करून देत आहेत टेलीकन्सल्टेशन च्या प्स मार्फत रुग्णांशी संपर्क करत आहेत कोरोना ची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आणि त्यापुढे सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णालयापर्यंत पोहोचवून त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत ही इच्छा आहे या तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे हळूहळू समोर येतीलच पण तोवर आपल्या रुग्णाचा आजार स्टेबल राहावा व नियमित औषध उपचार चालू राहावे यासाठी नातेवाईक डॉक्टर व रुग्ण मिळून एकत्र प्रयत्न करुया हीच या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त इच्छा व्यक्त करते.
डॉ.ऋचा सुळे -खोत, मानसोपचार तज्ञ,नाशिक