नाशिक- जिल्'ातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत सुमारे आठ कोटी रुपयांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली. मात्र अशी खरेदी करताना अनावश्यक वस्तूची खरेदी टाळावी2 तसेच पुरवठा दारांकडून किंमती बाबत तडजोड करून कोरोनासाठी लागणाऱ्या अँटिजेंन किटची खरेदीला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन घेण्यात आली. सभेत आरोग्य विभागाने कोरोनासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या 7 कोटी रुपयांतुन कोरोनासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 45 प्रकारच्या2 औषध व इतर साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर यांनी सांगितले, त्यावर सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. या खरेदीत कोरोनासासाठी औषधे खरेदी ठीक असली तरी, बेडशीट, चादर, खोबरेल तेल आशा गोष्टींची काय गरज अशी विचारणा केली, त्याच बरोबर दीडशे रुपयांना मिळणारी चादर 250 रुपयात खरेदीचे प्रयोजन काय अशा सवाल केला. इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असेल तर टेंडर काढण्यात यावे व परवडेल अशा ठेकेदाराला काम देण्यात यावे अशी सूचना केली. त्यावर कोरोनाचा सध्याचा वाढीचा वेग पाहता, निविदा मागविणे व नंतरची प्रक्रिया राबविण्यात वेळ जाणार असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या दरात व ठेकेदाराकडून औषधी खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्'ातील सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, नाशिक येथे प्रामुख्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यासाठी अत्यावश्यक खरेदी महत्वाची असल्याचे पटवून देण्यात आले. मात्र सदस्यांनी या प्रश्नी असलेल्या शंका, हरकती मांडल्या. संजय बनकर, उदय जाधव, दीपक शिरसाठ यांनी, खरेदी करावी मात्र त्यासाठी ताडजोड करून रक्कम कमी करावी, त्याचबरोबर सदरच्या वस्तू आरोग्य केंद्र, कोविड सेंटर ला पोहचतात की नाही हे पाहण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सदस्यांच्या प्रश्नाचे समाधान केले, त्या म्हणाल्या, गेल्या आठवड्यात पुरवठादार यांच्याशी दराबाबत निगॉसिएशन करण्यात आले असून, खुल्या मार्केट मधील दराची माहितीही घेण्यात आली आहे. या सर्व बाबीची माहिती व अभ्यास करून दर निश्चित करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत खरेदीत जास्त किंमत दिली जाणार नाही याची ग्वाही आपण देत असल्याचे त्या म्हणाल्या.जिल्हा रुग्णालयाकडून आज पर्यंत 7 हजार तपासणी किट देण्याचे ठरविण्यात आले, त्यापैकी 4 हजार किट मिळाल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले. त्यावर सदस्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही खरेदी आवश्यक असल्याने त्याची तातडीने खरेदी करावी असे म्हणत विषयाला मंजुरी.आयत्या वेळेच्या विषयात पुन्हा एक कोटी रुपयांची औषध खरेदीचा विषय मांडण्यात आल्यावर सदस्यांनी त्यालाही हरकत घेतली. मार्च महिन्यात जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी एक कोटी रुपये मंजुरीचे पत्र दिलेले असताना सहा महिने उशिराने का खरेदी करतात असा प्रश्न सिद्धार्थ वणारसे यांनी विचारला व या विलंबस दोषी असलेल्यावर कारवाई करा अशी मागणी केली. त्यावर डॉ. आहेर यांनी फक्त पैसे मंजुरीचे पत्र मिळाले होते, प्रत्यक्ष 28 जुलै रोजी पैसे मिळाल्यामुळे उशीर झाल्याचे सांगितले.९० हजार किट खरेदी करणारजिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेने मान्यता दिलेल्या निधीतून ग्रामीण भागासाठी 90 हजार तपासणी किट खरेदी करण्यात येणार आहे. त्यात 50 हजार रॅपिड किट व 40 हजार व्ही टी एम तपासणी किट असेल. सिन्नर, निफाड, इगतपुरी, नांदगाव, नाशिक, बागलाण या तालुक्यात त्याचा वापर करण्यात येणार आहे. विशेष करून काँट्रॅक्ट ट्रेसिंग साठी याचा वापर होईल.