पेठ : करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत कोरोनामुक्त भारत / जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात सर्वेक्षण केले. यात योगेश खाडम, राहुल गवळी, मीनल धूम, प्रकाश गायकवाड, नरेंद्र गवळी, शुभम जोशी, कामिनी राऊत, रूपाली खंबाईत, यशोदा गवळी, महेश गवळी, नंदराज, पंकज व जोेत्स्ना मालगावे यांनी सहभाग घेतला. कुटुंबातील व्यक्तींना कोरोना आजाराची लक्षणे, उपचार, प्रतिबंध आणि उपाय यावर माहिती सांगत जनजागृती केली.विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अविनाश जोंधळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित निकम, प्रा. डॉ. स्मिता चव्हाण, प्रा. डॉ. दीपक तायडे, प्रा. डॉ. निरंजन गिरी, प्रा. डॉ. प्रकाश वानखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. रोहित निकम यांनी कोरोना आजारावर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध लिहिला असून आहे. पंचवटी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कैलास कापडणीस, प्राचार्य डॉ. आर. वाय. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. निकम यांनी कोरोनावर अहिराणी भाषेत कवितालेखन करत कसमादे पट्ट्यात जनजागृतीही केली.
कोरोनाबाबत जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 9:59 PM