लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : दर तीन वर्षांनी येणाºया अधिक मासास कोणी मलमास, कोणी पुरु षोत्तम मास तर कोणी धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात तिर्थक्षेत्री जाउन स्नान करु न देवाचे दर्शन घेतात. त्याला धोंडा न्हाणे असेही म्हणतात. तर कोणी दुष्काळात तेरावा महिना असेही म्हणतात.यावर्षी भाद्रपदानंतर आश्विन महिन्यात अधिक मास आल्याने नवरात्र, विजया दशमी, दिवाळी आदी सण महिनाभर पुढे सरकले आहेत. मात्र या अधिकमासानिमित्त नहेमी होणाºया गर्दीला कारोनामुळे यंदा ब्रेक लागला आहे.यावर्षी जवळपास १६० वर्षांनी आलेला हा दुर्मिळ योग आलेला आहे. शुक्रवार दि.१८ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबर २०२० पर्यंत अधिक मास आहे. मीन राशीत सुर्यअसतांना चांद्र मासाचा आरंभ होतो. तोच चैत्र महिना होय. तर मेष राशीत सुर्य असतांना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, तो वैशाख महिना असतो. जर एका राशीत सुर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर तो पहिला अधिक मास असतो. तर दुसरा तो निजमास असतो. तीस तिथींचा एक चांद्रमास व ३६० तिथींचे (१२ चांद्र मासाचे एक चांद्रवर्ष होते. तसेच एका सौर वर्षाच्या तशा सुमारे ३७१ तिथी होतात. प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर मासापेक्षा ११ तिथी शिल्लक ३० तिथी झाल्या की अधिक मास येऊन चंद्र व सौर पध्दतीचा मेळ बसतो. जेव्हा अधिक मास येतो. त्यावेळी तेरा चांद्रमासांचे म्हणजे ३९० तिथींचे एक चांद्रवर्ष असते. एकदा अधिक मास आल्यापासुन मध्यम मानाने साडे बत्तीस चांद्र महिन्यांनी पुन्हा अधिक मास येतो. स्पष्ट मानाने दोन अधिक मासांमध्ये कमीत कमी २७ महिनेव जास्तीत जास्त ३४ महिने अंतर असते. ज्या चांद्र महिन्यात सुर्याचे राशी संक्र मणहोत नाही, तो स्पष्ट अधिक मास समजला जातो. या महिन्यात संपुर्ण महिनाभर उपोषण, अयाचित नक्तभोजन किंवा एकभुक्त राहतात. हे व्रत महिना भर करण्याची पध्दत असली तरी महिनाभर करण्यास जमत नसेल तर एक दिवस केले तरी चालते. या महिन्यात व्यतिपात किंवा वैधृती योग आल्यास ३३ अनारसे दान करण्याची पध्दत आहे.त्र्यंबकेश्वर येथे श्रावण मासाप्रमाणे भाविकांची गर्दी होत असते. विशेषत: महिला वर्गाची गर्दी लक्षणीय असते. सध्या बस सुरु झाल्या असल्या तरी बसमध्ये बसण्यास सहसा प्रवासी कचरत आहेत. पण परिवहन महामंडळ देखील आता प्रवाशांची विशेष काळजी घेत आहे.
यंदा अधिक मासानिमित्त होणाऱ्या गर्दीला कोरोनाने लावला ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 6:52 PM
त्र्यंबकेश्वर : दर तीन वर्षांनी येणाºया अधिक मासास कोणी मलमास, कोणी पुरु षोत्तम मास तर कोणी धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात तिर्थक्षेत्री जाउन स्नान करु न देवाचे दर्शन घेतात. त्याला धोंडा न्हाणे असेही म्हणतात. तर कोणी दुष्काळात तेरावा महिना असेही म्हणतात.यावर्षी भाद्रपदानंतर आश्विन महिन्यात अधिक मास आल्याने नवरात्र, विजया दशमी, दिवाळी आदी सण महिनाभर पुढे सरकले आहेत. मात्र या अधिकमासानिमित्त नहेमी होणाºया गर्दीला कारोनामुळे यंदा ब्रेक लागला आहे.
ठळक मुद्देयावर्षी जवळपास १६० वर्षांनी आलेला हा दुर्मिळ योग आलेला आहे.