यंदा वीरांची मिरवणूक नसल्याने गंगाघाट परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला असल्याचे दिसून आले. गंगाघाट आणि रामकुंड, गाडगे महाराज पटांगण भागात जागोजागी पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी गंगाघाटावर शेकडो वीरांची गर्दी होते, तर भाविक शेकडोंच्या
संख्येने उपस्थित असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे वीरांच्या मिरवणुकीवर प्रशासनाने निर्बंध लादल्याने इतिहासात प्रथमच गंगाघाटावर वीरांची मिरवणूक आली नसल्याचे बोलले जात आहे.
इन्फो===
पोलिसांची दबंगगिरी
रामकुंड परिसरात पंचवटी पोलिसांनी संपूर्ण परिसरात लोखंडी बॅरिकेड्स केले होते व पोलीस बळ तैनात करण्यात आले होते.
मालवीय चौकातून नागरिक खाली रामकुंडाकडे जात होते. मात्र, बॅरिकेड्समुळे नागरिकांना पुढे जाता येत नव्हते. कोणी चुकून रामकुंडावर जाण्याचा प्रयत्न केला, तर बंदोबस्तासाठी नेमलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील ‘दबंग’गिरी करणाऱ्या अधिकाऱ्याकडून थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात होती.
(फोटो डेस्कॅनवर)