ठळक मुद्देआतापर्यंत त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनामुळे पाच रु ग्ण मृत्युमुखी
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा उपद्रव वाढतच असून, आतापर्यंत तालुक्यात २०७ रु ग्ण बाधित झाल्याने ही साखळी कधी तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत १७१ रु ग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर २०७ रु ग्णांपैकी जिल्हा परिषद हद्दीतील १२० रु ग्ण होते. नगर परिषद हद्दीतील ८७ रु ग्ण होते. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनामुळे पाच रु ग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रु ग्ण ३१ असून, कोविड केअर सेंटरमध्ये १५, हेल्थ सेंटरमध्ये १, खासगी रु ग्णालयात ५ तर १० रु ग्ण होम क्वॉरण्टाइन असे एकूण ३१ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत, तर २८ जणांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.