शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जिल्ह्यात कोरोनाने घेतले तब्बल १० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:55 AM

जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. रविवारी नवीन १४४ बाधितांची भर पडण्यासह १० जणांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या तब्बल २२५ वर पोहोचली आहे. मृतात ७ नाशिक, येवला, पिंपळगाव बसवंत, देवळाली कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

ठळक मुद्देयंत्रणा हवालदिल : मृतांचा आकडा पोहोचला सव्वादोनशेवर; नव्या १४४ बाधितांची भर

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. रविवारी नवीन १४४ बाधितांची भर पडण्यासह १० जणांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या तब्बल २२५ वर पोहोचली आहे. मृतात ७ नाशिक, येवला, पिंपळगाव बसवंत, देवळाली कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १०० रुग्ण महानगरातील आहे. ग्रामीणचे ४२, मालेगावला एक तर जिल्हाबाह्य एक याप्रमाणे १४४ बाधितांची नव्याने भर पडली आहे. रविवारी दाखल नवीन संशयितांमध्ये ३५७ मनपा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय ९, वैद्यकीय महाविद्यालय ३, मालेगाव ३०, ग्रामीण रुग्णालय ११२, तर गृहविलगीकरण कक्षातील ४३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १५१७ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.येवला,पिंपळगावी सहा पॉझिटिव्हशहरात कोरोना- बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी चाररु ग्ण पॉझिटिव्ह आले असताना रविवारी पुन्हा ६ जण बाधित असल्याचा अहवाल आल्याने रु ग्णसंख्या ३६ झाली आहे.सिन्नरची रुग्णसंख्या ९९सिन्नर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्याने आरोग्य विभागावर ताण वाढत चालला आहे. रविवारी दुपारी १५रु ग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने सिन्नर तालुक्यातील रु ग्णसंख्या ९९ झाली असून, तालुका शंभरीच्या उंबरठ्यावर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.बागलाणला चार बाधितबागलाण तालुक्याच्या अन्य भागातही बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि.२८) पुन्हा चार कोरोना- बाधित आढळून आले. ब्राह्मणगाव परिसरात प्रथमच बाधित आढळल्याने प्रशासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.देवळ्यात दोघे पॉझिटिव्हग्रीन झोनमध्ये असलेल्या देवळा तसेच खुंटेवाडी येथे प्रत्येकी एक अशा दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत देवळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये पाच व्यक्तींसह एकूण सात जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. याशिवाय बाधिताच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. निफाड, नांदगावला वाढीव बेड्सयेवल्यातील बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला, निफाड आणि नांदगावमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या तालुक्यांमध्ये अतिरिक्त बेड्सचे तत्काळ नियोजन करण्याचे आदेश दिले. कोरोनाला रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांशी संवाद साधून या प्रक्रियेत त्यांचीही मदत घेण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या