नाशिक : कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मेअखेर काजव्यांची चमचम पहावयास मिळते. वळव्याच्या पावसानंतर येथील वृक्षराजीवर जणु तारकादळे लखलखते; मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली काजवा महोत्सव सापडला आहे. रोजगार बुडाला तर चालेल; मात्र काजवा महोत्सवाद्वारे कोरोनाला निमंत्रण द्यायचे नाही, असा कठोर निर्णयच या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या गावकऱ्यांनी ठरावाद्वारे घेतला. नाशिक वन्यजीव विभागानेदेखील मागील दोन महिन्यांपासून अभयारण्याची वाट पर्यटकांसाठी बेमुदत कालावधीसाठी बंद केली आहे.नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी काजवा महोत्सव पार पडणार नसल्याचे नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे. पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्याकरिता नाशिक वनवृत्तासह राज्यभरातील अभयारण्य, राखीव वने प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये दोन महिन्यांपासून बेमुदत बंद ठेवण्यात येत आहेत.दरवर्षी मे अखेरीस कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील अर्जुनसादडा, उंबर, जांभूळ, बेहडा, हिरडा, सादडा यांसारख्या वृक्षराजीवर काजव्यांची चमचम अनुभवयास येते. मान्सूनच्या सरीं कोसळेपर्यंत काजवे या भागात लुकलुकतात. रात्रीच्याअंधारात जणू धरतीवर प्रकाशफुलेच अवतरली की काय असा भास होतो. खरं तर हा कालावधी जैवविविधतेतील काजवा या किटकाचा प्रजननाचा असतो.दरवर्षी महिनभर निसर्गाचा हा अद्भूत व डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा बघण्यासाठी नाशिक, अहमदनगर या जवळ्या जिल्ह्यांसह मुंबई, पुणे या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, भावनगर या भागातूनही पर्यटक येथे हजेरी लावतात. यावर्षी या नाशिक वन्यजीव विभागाला मिळणाºया महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. या भागातील विविध आदिवासी गाव, पाड्यांवरील सुमारे ३५० कुटुंबियांचा रोजगारही बुडणार आहे. निवास-न्याहारी, गाईड, जंगल भ्रमंती आदिंच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दर दिवसाला या महोत्सवात किमान १ हजार तर कमाल ५ हजार रुपये मिळत होते.साडेतीनशे आदिवासी कुटुंबाचा रोजगार बुडालाअभयारण्य क्षेत्रातील गावांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोरोनामुळे आहे. येथील आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुसरा आधार म्हणजे पर्यटन. मात्र यावर्षी कोरोना या जीवघेण्या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद झाले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे.मागील वर्षी सुमारे ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल नाशिक वन्यजीव विभागाला काजवा महोत्सवाच्या माध्यमातून मिळाला होता. २०१८ सालापासून पर्यटकांकडून शुल्क आकारणी वन्यजीव विभाग करत आहे. गेल्या वर्षी २०१८च्या महोत्सवाच्या तुलनेत दहा हजाराने पर्यटक वाढले होते. यावर्षी कोरोनामुळे अभयारण्य मागील दोन महिन्यांपासून बंदच असून पुढील आदेश अद्याप प्राप्त नाही. काजवा महोत्सवदेखील वरिष्ठांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.- दत्तात्रय पडवळे, वनक्षेत्रपाल, भंडारदरा
पर्यटनाच्या हंगामावर पाणीउन्हाळ्यात संध्याकाळनंतर भंडारदरा धरणाच्या काठालगत कॅम्पेनिंग, पावसाळ्याच्या तोंडावर काजवा महोत्सव आणि नंतर पावसाळी पर्यटन असा हा हंगाम असतो. या नऊ दे दहा महिन्यांत येथील आदिवासी तरुणांना चांगली कमाई होते; मात्र यंदा सगळा हंगाम संकटात सापडला आहे. साधारणत: सरासरी तीनशे ते साडेतीनशे कुटुंबांना यावर्षी मोठा आर्थिक फटका बसणार आहे. - केशव खाडे, स्थानिक गाइड