नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ असतानाच संपूर्ण जिल्हाभरातील नागरिक संकटात आहे. मात्र याच संकटाचा संधी म्हणून गैरफायदा घेत काही प्रयोगशाळांनी (डायग्नोस्टिक सेंटर) रुग्णांची लूट चालवली आहे. कोरोनाकाळात रुग्णांची होणारी लूट लक्षात घेता सरकारने विविध चाचण्यांचे दर निश्चिच केले असले तरी नफा कमाविण्यासाठी कोरोना संकटाचा फायदा करून घेणाऱ्या रोगनिदान केंद्रांकडून शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करून कोरोना संकटात चाचण्यांचे वाढीव दर आकारून आरोग्यसेवेचा बाजार मांडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अशा रोगनिदान केंद्रांविषयी संताप व्यक्त होत आहे. काही नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत अशा रोगनिदान केंद्रांची भांडाफोडही करीत आहे. मात्र अशा प्रकारच्या संस्थांवर शासन व प्रशासनाचा कोणताही अंकुश उरलेला नसल्याने शहरातील डायग्नोस्टिक सेंटरचा मनमानी कारभार सुरू आहे.
इन्फो-१
एजंटांची टक्केवारी वेगळीच
१) सरकारने रोगनिदान केंद्रांना हे दर कमी करून अडीच हजार रुपये करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र गर्दीचा फायदा घेत रोगनिदान केंद्रांकडून अजूनही पाच ते सहा हजार रुपये आकारले जात आहेत. विशेष म्हणजे गर्दीत लवकर नंबर लावून देण्यासाठी अशा लॅब बाहेर एजंट कार्यरत असल्याचेही दिसून येते.
२) काही दिवसांपूर्वी एका प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये तफावत आढळल्याने अशा खासगी लॅबही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. राज्यात काही ठिकाणी जिल्हांतर्गत प्रवासासाठी अशा प्रकारचे बनावट अहवाल समोर आले असून, त्यासाठी अज्ञात एजंट कार्यरत असल्याची शाशंकता व्यक्त होत आहे.
३) शहरात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या सहा ते सात लॅब आहेत. मात्र या वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळे दर आकारले जात आहेत. यात चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र काही एजंट वाढीव पैशांची मागणी करून दुसऱ्याच दिवशी अहवाल मिळवून देण्याचे आश्वासन देत रुग्णांची लूट करीत आहेत.
इन्फो- २
यांच्यावर नियंत्रण कोणाचे
नाशिक जिल्ह्यात कोरना रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना वेगवेगळ्या डायग्नोस्टिक सेंटरकडून रुग्णांची लूट होत असताना आरोग्यव्यवस्था व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या या डायग्नोस्टिक सेंटरवर कोणाचेही नियंत्रण उरले नसल्याचे दिसून येत आहे.
चौकट-१
चाचण्या आणि दर
चाचणी - लॅब-१ लॅब-२ लॅब-३ लॅब-४
अँटिजन - ००००
आरटीपीसीआर - ०००
सीबीसी -०००
सीआरपी -०००
डी डायमर - ०००
एलएफटी - ००००
केएफटी - ००००