ठळक मुद्देपार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप यांच्या अध्यक्षतेखाली
येवला : राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक यांचा १७ व्या स्मृती दिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकच्यावतीने युट्यूबवर ऑनलाईन निमंत्रितांचे कोरोना लोकजागृती शाहिरी, काव्य, गीत, गझल संमेलन शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजता पार्श्वगायक नंदेश विठ्ठल उमप यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी दिली आहे.संमेलनात महाराष्ट्रातील मान्यवर कवी, गझलकार, अशोक भालेराव, नुमान शेख, तारका जाधव, सुनीता इंगळे, नीलेश पवार, रमेश बुरबुरे, बबन सरोदे, भास्कर अमृतसागर, सोनाली सोनटक्के, रवीराज सोनार, मधुकर जाधव, सुनील खरे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.