नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारच्या दिवसभरात २२४ने भर पडली असून, २२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर नाशिक मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या एक मृत्युमुळे एकूण मृतांची संख्या २०९० झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २० हजार १८२ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १६ हजार १५१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर २०९० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६५ आहे. त्यात नाशिक शहरात ९७.०८, नाशिक ग्रामीण ९६.३४, मालेगाव शहरात ९२.३९, तर जिल्हाबाह्य ९४.५४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २९ हजार ९१६ असून, त्यातील चार लाख नऊ हजार ००६ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २० हजार १८२ रुग्ण बाधित आढळून आले असून, ७२८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.